मुंबई : सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या घसरणीने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स साडेसहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. ११८ अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स २६,५९९.११ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३९.७0 अंकांनी घसरून ८,0५७.३0 अंकांवर बंद झाला.
करविषयक चिंता आणि आर्थिक सुधारणांना गती देणाऱ्या विधेयकांबाबतची अनिश्चितता यामुळे विदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारांतील आपली गुंतवणूक काढून घेत आहेत. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपया २0 महिन्यांच्या नीचांकावर गेला आहे. या सर्वांचा फटका बाजाराला बसला आहे.
३0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळपासूनच मंदीत होता. ११८.२६ अंक अथवा 0.४४ टक्क्यांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २६,५९९.११ अंकांवर बंद झाला. २१ आॅक्टोबर २0१४ रोजीनंतरची ही सर्वांत नीचांकी पातळी ठरली आहे. सेन्सेक्सच्या घसरणीचा आजचा सलग तिसरा दिवस होता. या तीन दिवसांत सेन्सेक्सने ८९१.४८ अंक गमावले आहेत. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३९.७0 अंक अथवा 0.४९ टक्क्यांनी घसरून ८,0५७.३0 अंकांवर बंद झाला. १७ डिसेंबरनंतरच्या निफ्टीची ही सर्वाधिक नीचांकी पातळी ठरली आहे. ४ मार्च रोजी सेन्सेक्स ३0,0२४.७४ अंकांवर पोहोचला होता. ही त्याची सार्वकालिक सर्वोच्च पातळी होती. त्यानंतर मात्र सेन्सेक्स घसरणीला लागला. आजपर्यंत तब्बल ३,४२५.६३ अंकांची अथवा ११.४0 टक्क्यांची घसरण सेन्सेक्सने नोंदविली. ४ मार्च रोजी निफ्टी ९,११९.२0 अंकांवर पोहोचला होता. निफ्टीचीही ही सर्वोच्च पातळी होती. त्यानंतरच्या दोन महिन्यांच्या काळात निफ्टीने १,0६१.९0 अंक अथवा ११.६४ टक्क्यांची घसरण नोंदविली आहे. आजच्या घसरणीचा सर्वाधिक २.९५ टक्क्यांचा फटका अॅक्सिस बँकेला बसला. त्याखालोखाल ओएनजीसी २.९४ टक्क्यांनी घसरली. याशिवाय मारुती सुझुकी,हिंदाल्को, आयसीआयसीआय बँक, टाटा पॉवर, डॉ. रेड्डीज आणि टाटा मोटर्स यांचे समभागही घसरले. आजची घसरण बाजारात व्यापक प्रमाणात दिसून आली. स्मॉलकॅप आणि मीडकॅप निर्देशांक १.९५ टक्क्यांपर्यंत घसरला. सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३0 कंपन्यांपैकी १८ कंपन्यांचे समभाग घसरले. बाजाराची एकूण व्याप्तीही नकारात्मक राहिली. १,८५८ कंपन्यांचे समभाग घसरले. ८१३ कंपन्यांचे समभाग वाढले. १0९ कंपन्यांचे समभाग आदल्या दिवशीच्या पातळीवर स्थिर राहिले.
सेन्सेक्स ६.५ महिन्यांच्या नीचांकावर
सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या घसरणीने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स साडेसहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. ११८ अंकांच्या
By admin | Updated: May 8, 2015 01:01 IST2015-05-08T01:01:47+5:302015-05-08T01:01:47+5:30
सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या घसरणीने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स साडेसहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. ११८ अंकांच्या
