Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स ३४ अंकांनी खाली

सेन्सेक्स ३४ अंकांनी खाली

विधानसभा निवडणुकांच्या आधी सतर्कता दाखवीत गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतल्याने मंगळवारी शेअर बाजार कोसळला.

By admin | Updated: October 15, 2014 03:13 IST2014-10-15T03:13:05+5:302014-10-15T03:13:05+5:30

विधानसभा निवडणुकांच्या आधी सतर्कता दाखवीत गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतल्याने मंगळवारी शेअर बाजार कोसळला.

Sensex down by 34 points | सेन्सेक्स ३४ अंकांनी खाली

सेन्सेक्स ३४ अंकांनी खाली

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या आधी सतर्कता दाखवीत गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतल्याने मंगळवारी शेअर बाजार कोसळला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३४ अंकांनी खाली आला. रिअल्टी, ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू, आयटी, तेल आणि गॅस तसेच एफएमसीजी या क्षेत्रातील कंपन्यांना सर्वाधिक फटका बसला. खरे म्हणजे मंगळवारी बाजारासाठी पोषक वातावरण होते. एक तर घाऊक निर्देशांकावर आधारित महागाईचा दर घसरला होता, तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजचे तिमाही निकालही उत्साहवर्धक होते. तरीही बाजार कोसळला. रिअल इस्टेट क्षेत्रातील बडी कंपनी डीएलएफ आणि तिच्या सहा मोठ्या अधिकाऱ्यांना सेबीने ३ वर्षांसाठी प्रतिबंधित केले आहे. याचा परिणाम होऊन डीएलएफचा शेअर २८ अंकांनी कोसळला. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी मजबुतीसह २६,५३७.४२ अंकांवर उघडला होता. तो २६,५५0.७९ अंकांपर्यंत चढला. मध्यंतरानंतर विक्रीचा जोर वाढला. सेन्सेक्स ३४ अंकांनी खाली येऊन २६,३४९.३३ अंकांवर बंद झाला. एनएसईचा निफ्टी २0.२५ अंकांनी कोसळून ७,८६४.00 अंकांवर बंद झाला. निफ्टी ७,९२८ ते ७,८२५.४५ अंकांच्या मध्ये खाली-वर होताना दिसून आला.

Web Title: Sensex down by 34 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.