Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स ३१४ अंकांनी कोसळला

सेन्सेक्स ३१४ अंकांनी कोसळला

व्यापक प्रमाणात झालेल्या नफा वसुलीमुळे सोमवारी शेअर बाजार कोसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३१४ अंकांनी घसरून २७,६४३.८८ अंकांवर बंद झाला.

By admin | Updated: May 26, 2015 00:07 IST2015-05-26T00:07:01+5:302015-05-26T00:07:01+5:30

व्यापक प्रमाणात झालेल्या नफा वसुलीमुळे सोमवारी शेअर बाजार कोसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३१४ अंकांनी घसरून २७,६४३.८८ अंकांवर बंद झाला.

Sensex down 314 points | सेन्सेक्स ३१४ अंकांनी कोसळला

सेन्सेक्स ३१४ अंकांनी कोसळला

मुंबई : व्यापक प्रमाणात झालेल्या नफा वसुलीमुळे सोमवारी शेअर बाजार कोसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३१४ अंकांनी घसरून २७,६४३.८८ अंकांवर बंद झाला.
आयटीसीच्या नफ्यात अपेक्षेपेक्षा कमी वाढ झाल्यामुळे बाजारात घसरणीचा जोर निर्माण झाल्याचे दिसून आले. मार्चला संपलेल्या तिमाहीत आयटीसीचा नफा ३.६५ टक्क्यांनी वाढून २,३६१.१८ कोटी झाला आहे.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी मंदीसह उघडला होता. त्यानंतर तो २७,६१४.३२ अंकांपर्यंत खाली गेला होता. सत्र अखेरीस ३१३.६२ अंकांची अथवा १.१२ टक्क्यांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २७,६४३.८८ अंकांवर बंद झाला. शुक्रवारी सेन्सेक्स १४८.१५ अंकांनी वाढला होता.
सेन्सेक्समधील ३0 पैकी २६ कंपन्यांचे समभाग घसरले. ओएनजीसी, भारती एअरटेल, विप्रो आणि एमअँडएमचे समभाग वाढले.
५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८८.७0 अंकांनी अथवा १.0५ टक्क्यांनी घसरून ८,३७0.२५ अंकांवर बंद झाला.
आशियातील जपान, चीन, सिंगापूर आणि तैवान येथील बाजार 0.0७ ते ३.३५ टक्क्यांनी वाढले. हाँगकाँग आणि दक्षिण कोरिया येथील बाजार बंद होते. युरोपीय बाजारांत सकाळी मंदीचे वातावरण दिसून आले.
बाजाराची एकूण व्याप्ती नकारात्मक राहिली. १,५३१ कंपन्यांचे समभाग घसरले. १,१४९ कंपन्यांचे समभाग वाढले. ११४ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजारातील एकूण उलाढाल घटून १,९७४.८९ कोटी रुपये झाली. आदल्या सत्रात ती ३,0२३.९३ कोटी रुपये होती. (वृत्तसंस्था)

४मुंबई - मोदी सरकार स्थानापन्न झाल्यापासून आर्थिक सुधारणांच्या आशेमुळे गेल्या अकरा महिन्यांत बाजाराने सातत्याने तेजी अनुभवली. या पार्श्वभूमीवर विविध कंपन्यांच्या बाजारमूल्यात घसघशीत वाढ होत या मूल्याने दहा लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला.
४बाजारातील या तेजीचा सर्वाधिक फायदा अदानी, टाटा, भारती, एचडीएफसी, सन ग्रुप्स आदी कंपन्यांना आणि पर्यायाने त्यांच्या गुंतवणूकदारांना झाल्याचे दिसून आले आहे. या तुलनेमध्ये दोन्ही अंबानी समुह, आयटीसी, एल अँड टी या समुहांच्या समभागांत मात्र उल्लेखनीय वाढ नोंदली गेली नाही.
४गेल्या अकरा महिन्याच्या कालावधीत सेन्सेक्समध्ये २९५० अंशांची वाढ नोंदली गेली.

Web Title: Sensex down 314 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.