Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स ३ महिन्यांच्या नीचांकावर

सेन्सेक्स ३ महिन्यांच्या नीचांकावर

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती विक्रमी पातळीवर घसरल्यामुळे मंगळवारी शेअर बाजारांत मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २२0 अंकांनी घसरून २५,३१0.३३ अंकांवर बंद झाला.

By admin | Updated: December 8, 2015 23:43 IST2015-12-08T23:43:23+5:302015-12-08T23:43:23+5:30

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती विक्रमी पातळीवर घसरल्यामुळे मंगळवारी शेअर बाजारांत मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २२0 अंकांनी घसरून २५,३१0.३३ अंकांवर बंद झाला.

Sensex down to 3-month low | सेन्सेक्स ३ महिन्यांच्या नीचांकावर

सेन्सेक्स ३ महिन्यांच्या नीचांकावर

मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती विक्रमी पातळीवर घसरल्यामुळे मंगळवारी शेअर बाजारांत मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २२0 अंकांनी घसरून २५,३१0.३३ अंकांवर बंद झाला.
जीएसटी विधेयकाबाबत निर्माण झालेली अस्थिर स्थिती तसेच विदेशी गुंतवणूकदारांनी केलेला विक्रीचा मारा याचाही बाजारातील धारणेवर परिणाम झाला. रुपयाच्या घसरणीने त्यात कडी केली.
बीएसई सेन्सेक्स दिवसभर अस्थिर होता. २५,२५६.७९ आणि २५,५४२.४७ अंकांच्या मध्ये तो हिंदोळत होता. सत्राच्या अखेरीस २१९.७८ अंकांची अथवा 0.८६ टक्क्याची घसरण नोंदवून सेन्सेक्स २५,३१0.३३ अंकांवर बंद झाला. हा सेन्सेक्सचा तीन महिन्यांचा नीचांक ठरला आहे. ७ सप्टेंबर रोजी सेन्सेक्स २४,८९३.८१ अंकांवर बंद झाला होता.
व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,७00 अंकांच्या खाली आला आहे. ६३.७0 अंकांची अथवा 0.८२ टक्क्याची घसरण नोंदवून निफ्टी ७,७0१.७0 अंकांवर बंद झाला.
५ टक्क्यांच्या घसरणीसह गेल सर्वाधिक घसरण झालेली कंपनी ठरली. अन्य घसरणाऱ्या कंपन्यांत वेदांता, हिंदाल्को, डॉ. रेड्डीज, ओएनजीसी, टाटा स्टील, कोल इंडिया, भेल, एल अँड टी, आरआयएल, एसबीआय, लुपीन, विप्रो, एम अँड एम, एचडीएफसी, हीरो मोटोकॉर्प, एचयूएल, सन फार्मा, आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस बँक, भारती एअरटेल, सिप्ला आणि मारुती सुझुकी यांचा समावेश आहे. घसरणीच्या या गदारोळात टाटा मोटर्स, बजाज आॅटो, आयटीसी आणि टीसीएस या कंपन्यांचे समभाग मात्र वाढले. (वृत्तसंस्था)

Web Title: Sensex down to 3-month low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.