मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी २८ अंकांनी घसरून २७,८0९.३५ अंकांवर बंद झाला. कमजोर तिमाही निकालांमुळे बाजार चिंतित आहे. त्यामुळे ही घसरण झाली.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीसह २७,८८५.३६ अंकांवर उघडला होता. त्यानंतर तो आणखी वर चढून २७,९११.४४ अंकांवर गेला. मात्र, त्यानंतर विक्रीचा मारा झाला आणि बाजार खाली आला. सत्र अखेरीस २७.८६ अंकांची अथवा 0.१0 टक्क्यांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २७,८0९.३५ अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २.२५ अंकांनी अथवा 0.0३ टक्क्यांनी घसरून ८,४२१ अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्समधील कंपन्यांपैकी टाटा स्टीलचा समभाग सर्वाधिक ५.११ टक्के घसरला. वेदांता, एचडीएफसी, सिप्ला, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, एसबीआय आणि मारुती सुझुकी या कंपन्यांचे समभागही घसरले. आशियाई बाजारात संमिश्र कल दिसून आला. हाँगकाँग, दक्षिण कोरिया आणि तैवान येथील बाजार 0.२२ टक्के ते १.१0 टक्के घसरले. जपान, सिंगापूर आणि चीन येथील बाजार मात्र 0.0१ टक्के ते १.८७ टक्के वर चढले. फ्रान्स आणि जर्मनी येथील 0.३५ टक्के ते 0.३८ टक्के घसरले. (वृत्तसंस्था)
सेन्सेक्स २८ अंकांनी घसरला; निफ्टीही खाली
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी २८ अंकांनी घसरून २७,८0९.३५ अंकांवर बंद झाला. कमजोर तिमाही निकालांमुळे बाजार चिंतित आहे. त्यामुळे ही घसरण झाली.
By admin | Updated: May 21, 2015 23:33 IST2015-05-21T23:33:52+5:302015-05-21T23:33:52+5:30
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी २८ अंकांनी घसरून २७,८0९.३५ अंकांवर बंद झाला. कमजोर तिमाही निकालांमुळे बाजार चिंतित आहे. त्यामुळे ही घसरण झाली.
