मुंबई : सलग तिसऱ्या आठवड्यातील घसरण नोंदविताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी २१४ अंकांनी कोसळून २७,0११.३१ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८२00 अंकांच्या खाली आला आहे. मासिक डेरिव्हेटिव्ह सौद्यांच्या समाप्तीचा दिवस असल्यामुळे ब्ल्यूचिप कंपन्यांत मोठ्या प्रमाणात विक्रीचा मारा झाल्याने बाजार घसरला.
बीएसई सेन्सेक्स ७ जानेवारी रोजी २६,९0८.८२ अंकांवर बंद झाला होता. त्यानंतरची ही सर्वाधिक नीचांकी पातळी ठरली आहे. मॅट कराची चिंता, चौथ्या तिमाहीतील कंपन्यांची कमजोर कामगिरी आणि जागतिक पातळीवरील कमजोर स्थिती ही आणखी काही कारणे घसरणीमागे आहेत. शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्ताने शेअर बाजार बंद राहणार आहेत.
५0 कंपन्यांच्या व्यापक आधारावरील एनएसई निफ्टी ५८.२५ अंकांनी अथवा 0.७१ टक्क्यांनी घसरून ८,१८१.५0 अंकांवर बंद झाला. सत्रादरम्यान तो ८,२२९.४0 आणि ८,१४४.७५ अंकांच्या मध्ये झुलताना दिसून आला.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला बीएसई सेन्सेक्स सकाळी २७,२४२.0५ अंकांवर तेजीसह उघडला होता. त्यानंतर मात्र तो घसरणीला लागला. एका क्षणी तर तो २७,000 अंकांच्याही खाली गेला होता. सत्र अखेरीस तो २७,0११.३१ अंकांवर बंद झाला. २१४.६२ अंकांची अथवा 0.७९ टक्क्यांची घसरण त्याने नोंदविली. काल सेन्सेक्सने १७0.४५ अंकांची घसरण नोंदविली होती.
अमेरिकी बाजारात काल विक्रीचा प्रचंड मारा झाला होता. त्याचे पडसाद आज आशियातील बाजारांत दिसून आले. आशियातील बहुतांश बाजार घसरले. युरोपीय बाजारांत मात्र सकाळी तेजीचे वातावरण दिसून आले.
४एचडीएफसी, टाटा स्टील, एमअँडएम, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, भारती एअरटेल यांचे समभाग घसरले. याशिवाय कोल इंडिया, डॉ. रेड्डीज, आयटीसी, हीरो मोटोकॉर्प, हिंदाल्को, हिंद युनिलिव्हर, इन्फोसिस आणि एसबीआय या बड्या कंपन्यांचे समभागही घसरले. जिंदला स्टील अँड पॉवरचा समभाग ४.१७ टक्क्यांनी घसरला.
४तत्पूर्वी काल विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ७१८.३१ कोटी रुपयांचे समभाग विकले.
सेन्सेक्स २१४ अंकांनी घसरला; ४ महिन्यांचा नीचांक
सलग तिसऱ्या आठवड्यातील घसरण नोंदविताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी २१४ अंकांनी कोसळून २७,0११.३१ अंकांवर बंद झाला.
By admin | Updated: May 1, 2015 01:41 IST2015-05-01T01:41:33+5:302015-05-01T01:41:33+5:30
सलग तिसऱ्या आठवड्यातील घसरण नोंदविताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी २१४ अंकांनी कोसळून २७,0११.३१ अंकांवर बंद झाला.
