मुंबई : सकाळी मजबूत सुरुवात केल्यानंतरही मुंबई शेअर बाजार गुरुवारी १३४ अंकांनी घसरला. बजाज आॅटो आणि लुपिन या ब्ल्यू चीप कंपन्यांनी तिमाही निकालात निराशा केल्याचा फटका बाजाराला बसला.
जूनला संपलेल्या तिमाहीतील निकालांच्या इतरही काही प्रमुख कंपन्यांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. त्याचा फटका बाजाराला बसला. संपूर्ण दिवसभर बाजार अल्पशा फरकाने चढत-घसरत होता. त्याच दरम्यान रुपयाचीही घसरण झाली. त्यामुळे बाजार खाली आला.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी २८,५४0.९७ अंकांवर उसळला होता. त्यानंतर तो २८,५७८.३३ अंकांपर्यंत वर चढला. वस्तू आणि सेवाकर विधेयकाबाबत आशा निर्माण झाल्यामुळे बाजारात प्राण आला होता. आशियाई बाजारातील तेजीचाही परिणाम दिसून आला. दुपारच्या सत्रात मात्र विक्रीचा जोर वाढला. त्यामुळे सत्र अखेरीस बाजार १३४.0९ अंकांनी अथवा 0.४७ टक्क्यांनी घसरून २८,३७0.८४ अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0 पैकी १८ कंपन्यांचे समभाग घसरले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,६00 अंकांवर बंद झाला. ४३.७0 अंकांची अथवा 0.५१ टक्क्यांची घसरण त्याने नोंदविली.
लुपिनला घसरणीचा सर्वाधिक फटका बसला. कंपनीचा समभाग ५.२३ टक्क्यांनी घसरला. जूनला संपलेल्या तिमाहीत लुपिनचा नफा १६ टक्क्यांनी घसरून ५२५.0२ कोटींवर आला आहे. त्याचा फटका कंपनीला बसला.
बजाज आॅटोचा समभाग ५.0२ टक्क्यांनी घसरला. बजाजचा नफा ३७.१४ टक्क्यांनी वाढूनही कंपनीला फटका बसला. रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग 0.४६ टक्क्यांनी घसरला.
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार मोठ्या प्रमाणात अस्थिर बनला आहे. अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या संभाव्य व्याज दरवाढीचे सावट बाजारावर आहे. (वृत्तसंस्था)
१३४ अंकांनी घसरला सेन्सेक्स
सकाळी मजबूत सुरुवात केल्यानंतरही मुंबई शेअर बाजार गुरुवारी १३४ अंकांनी घसरला. बजाज आॅटो आणि लुपिन या ब्ल्यू चीप कंपन्यांनी
By admin | Updated: July 24, 2015 00:08 IST2015-07-24T00:08:16+5:302015-07-24T00:08:16+5:30
सकाळी मजबूत सुरुवात केल्यानंतरही मुंबई शेअर बाजार गुरुवारी १३४ अंकांनी घसरला. बजाज आॅटो आणि लुपिन या ब्ल्यू चीप कंपन्यांनी
