Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्सची १३३ अंकांची डुबकी

सेन्सेक्सची १३३ अंकांची डुबकी

सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदवून भारतीय शेअर बाजार एक आठवड्याच्या नीचांकावर पोहोचले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १३३ अंकांनी घसरून २८,६६६.0४ अंकांवर बंद झाला.

By admin | Updated: April 16, 2015 23:45 IST2015-04-16T23:45:27+5:302015-04-16T23:45:27+5:30

सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदवून भारतीय शेअर बाजार एक आठवड्याच्या नीचांकावर पोहोचले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १३३ अंकांनी घसरून २८,६६६.0४ अंकांवर बंद झाला.

Sensex dips 133 points | सेन्सेक्सची १३३ अंकांची डुबकी

सेन्सेक्सची १३३ अंकांची डुबकी

मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदवून भारतीय शेअर बाजार एक आठवड्याच्या नीचांकावर पोहोचले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १३३ अंकांनी घसरून २८,६६६.0४ अंकांवर बंद झाला. टीसीएसच्या तिमाही निकालाच्या आधी आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांत जोरदार विक्री झाली.
३0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी २८,८७६.२३ अंकांवर तेजीसह उघडला होता. विदेशी संस्थांकडून खरेदीचा उत्साह दिसून येत होता. त्यानंतर मात्र ब्ल्यूचिप कंपन्यांत अचानक नफा वसुलीचे सत्र सुरू झाले. त्यामुळे सेन्सेक्स २८,४९७.७0 अंकांपर्यंत खाली घसरला. सत्र अखेरीस १३३.२६ अंकांची अथवा 0.४६ टक्क्यांची घसरण नोंदवून २८,६६६.0४ अंकांवर बंद झाला.
७ एप्रिलनंतरचा सेन्सेक्सचा हा नीचांकी स्तर ठरला आहे. गेल्या दोन दिवसांत सेन्सेक्सने ३७८.४0 अंक गमावले आहेत. सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३0 कंपन्यांपैकी १९ कंपन्यांचे समभाग घसरले.
आजच्या घसरणीचा सर्वाधिक फटका आयटी कंपन्यांना बसला. इन्फोसिसचा समभाग १ टक्क्याने घसरून २,१९१.१0 रुपयांवर बंद झाला.
विप्रो, टीसीएस आणि आयटीसी यांचे समभागही घसरले. याशिवाय हीरो मोटोकॉर्प, सन फार्मा, सिप्ला, डॉ. रेड्डीज लॅब, सेसा स्टरलाईट यांचे समभागही घसरले. इंडियन आॅईल, एचपीसीएल आणि बीपीसीएल या सरकारी तेल कंपन्यांचे समभागही घसरले. विक्रीचा जोर व्यापक होता. स्मॉलकॅप आणि मीडकॅप निर्देशांक 0.९१ टक्क्यांपर्यंत खाली आले. (वृत्तसंस्था)

४५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४३.५0 अंकांनी अथवा 0.५0 टक्क्यांनी घसरून ८,७0६.७0 अंकांवर बंद झाला. त्या आधी तो ८,७६0 आणि ८,६४५.६५ अंकांच्या मध्ये झुलताना दिसून आला.

Web Title: Sensex dips 133 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.