Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘फेड’च्या भीतीने सेन्सेक्स आपटला

‘फेड’च्या भीतीने सेन्सेक्स आपटला

अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या चेअरमन जेनेट येलेन यांनी व्याजदरांत वाढ करण्याचे संकेत दिल्यामुळे गुरुवारी मुंबई शेअर बाजार २३१ अंकांनी घसरला. गेल्या दोन आठवड्यातील ही सर्वांत

By admin | Updated: December 4, 2015 02:08 IST2015-12-04T02:08:20+5:302015-12-04T02:08:20+5:30

अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या चेअरमन जेनेट येलेन यांनी व्याजदरांत वाढ करण्याचे संकेत दिल्यामुळे गुरुवारी मुंबई शेअर बाजार २३१ अंकांनी घसरला. गेल्या दोन आठवड्यातील ही सर्वांत

Sensex crash in fear of 'Fed' | ‘फेड’च्या भीतीने सेन्सेक्स आपटला

‘फेड’च्या भीतीने सेन्सेक्स आपटला

मुंबई : अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या चेअरमन जेनेट येलेन यांनी व्याजदरांत वाढ करण्याचे संकेत दिल्यामुळे गुरुवारी मुंबई शेअर बाजार २३१ अंकांनी घसरला. गेल्या दोन आठवड्यातील ही सर्वांत मोठी घसरण ठरली असून, निर्देशांक २६ हजार अंकांच्या खाली आला आहे.
एका आर्थिक गटासमोर माहिती देताना जेनेट येलेन यांनी बुधवारी म्हटले की, ‘फेडरल रिझर्व्हला व्याजदर वाढ अपेक्षित आहे.’ येलेन यांच्या या वक्तव्यानंतर जगभरातील आर्थिक क्षेत्रांत धमाका झाला आहे. फेडरल रिझर्व्हने व्याजदरांत वाढ केल्यास उगवत्या अर्थव्यवस्थांना फटका बसेल, असे मानले जात आहे. याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारांवर गुरुवारी दिसून आला. याशिवाय सेवा क्षेत्राची नोव्हेंबरमधील कामगिरी असमाधानकारक राहिल्याचा परिणामही बाजारात दिसून आला.
बीएसई सेन्सेक्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. एका क्षणी सेन्सेक्स २५,८५७.३५ अंकांपर्यंत खाली घसरला होता. सत्राच्या अखेरीस तो २५,८८६.६२ अंकांवर बंद झाला. २३१.२३ अंकांची अथवा 0.८९ टक्क्यांची घसरण त्याने नोंदविली. १८ नोव्हेंबरनंतरची ही सर्वांत मोठी एकदिवसीय घसरण ठरली. कालच्या सत्रात सेन्सेक्सने ५१.५६ अंकांची घसरण नोंदविली होती.
५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,९00 अंकांच्या खाली गेला. ६७.२0 अंकांची अथवा 0.८५ टक्क्यांनी घसरून तो ७,८६४.१५ अंकांवर बंद झाला. तत्पूर्वी तो ७,८५३.३0 आणि ७,९१२.३0 अंकांच्या मध्ये हिंदोळे घेताना दिसून आला.
ओएनजीसीचा समभाग सर्वाधिक २.६५ टक्क्यांनी घसरला. त्यापाठोपाठ लुपीन आणि भेल यांचे समभाग घसरले. वेदांता, एलटीसी, एमअँडएम, टाटा मोटर्स, हीरो मोटोकॉर्प आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग २.२३ टक्क्यांपर्यंत घसरले. आयटी आणि आॅटो क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांत मोठ्या प्रमाणात विक्री पाहायला मिळाली. चेन्नई येथील पुरात आयटी कंपन्यांचा कारभार ठप्प झाल्याचा फटका त्यांना बसला आहे. सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0 कंपन्यांपैकी २५ कंपन्यांचे समभाग घसरले.
क्षेत्रनिहाय विचार करता बीएसई एफएमसीजी निर्देशांक सर्वाधिक १.४८ टक्क्यांनी घसरला.

Web Title: Sensex crash in fear of 'Fed'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.