मुंबई : गेल्या ६ दिवसांपासून मुंबई शेअर बाजारात आलेल्या तेजीला गुरुवारी ब्रेक लागला. नफेखोरी आणि जागतिक स्तरावरील संमिश्र प्रतिसादाने सेन्सेक्स १७१ अंकांनी घसरून २४,६२३.३४ अंकावर बंद झाला. निफ्टीसुद्धा ७,५०० अंकापेक्षा खाली आला. त्यातच अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होऊन ६७.०७ वर पोहोचल्याने घसरणीला थोडा लगाम लागला. गुरुवारी सकाळी तीस शेअर्सचा समावेश असलेला सेन्सेक्स मजबुतीच्या स्थितीत खुला झाला; पण त्यानंतर नफेखोरीमुळे तो १७०.६२ अंकांनी म्हणजे ०.६९ टक्क्यांनी घसरला. २४,६२३.३४ अंकावर बंद झाला.
गेल्या ६ व्यावसायिक सत्रात सेन्सेक्स १७९२ अंकांनी वधारला होता. गेल्या वर्षीच्या आॅक्टोबरनंतर प्रथमच शेअर बाजारात तेजी आली होती.
५० शेअर्सचा समावेश असलेला निफ्टी ७,५०० पेक्षा खाली घसरून ७,४८६.१५ अंकावर बंद झाला. संपूर्ण दिवसभर तो ७,४४७.४० ते ७,५४७.१० या दरम्यान खाली-वर होत राहिला.
नियोजित बीएनपी ‘परिबा’चे तज्ज्ञ विनोद नायर म्हणाले की, युरोपीय केंद्रीय बँकेची बैठक होणार असून त्यापूर्वी बाजारात चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे नफेखोरी होऊन बाजारात घसरण झाली.
सेन्सेक्सच्या तेजीला ब्रेक
गेल्या ६ दिवसांपासून मुंबई शेअर बाजारात आलेल्या तेजीला गुरुवारी ब्रेक लागला. नफेखोरी आणि जागतिक स्तरावरील संमिश्र प्रतिसादाने सेन्सेक्स १७१ अंकांनी घसरून २४,६२३.३४ अंकावर बंद झाला.
By admin | Updated: March 11, 2016 03:30 IST2016-03-11T03:30:33+5:302016-03-11T03:30:33+5:30
गेल्या ६ दिवसांपासून मुंबई शेअर बाजारात आलेल्या तेजीला गुरुवारी ब्रेक लागला. नफेखोरी आणि जागतिक स्तरावरील संमिश्र प्रतिसादाने सेन्सेक्स १७१ अंकांनी घसरून २४,६२३.३४ अंकावर बंद झाला.
