Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सलग सहाव्या सत्रात घसरला

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सलग सहाव्या सत्रात घसरला

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज सलग सहाव्या दिवशी घसरला. ४१.८४ अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स २६,४८१.२५ अंकांवर बंद झाला.

By admin | Updated: June 9, 2015 23:29 IST2015-06-09T23:29:52+5:302015-06-09T23:29:52+5:30

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज सलग सहाव्या दिवशी घसरला. ४१.८४ अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स २६,४८१.२५ अंकांवर बंद झाला.

The Sensex of the Bombay Stock Exchange declined for the sixth straight session | मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सलग सहाव्या सत्रात घसरला

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सलग सहाव्या सत्रात घसरला

मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज सलग सहाव्या दिवशी घसरला. ४१.८४ अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स २६,४८१.२५ अंकांवर बंद झाला. ही शेअर बाजारातील गेल्या चार महिन्यांतील सर्वांत मोठी सलग घसरण ठरली आहे. यंदा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवमान खात्याने व्यक्त केल्यामुळे महागाई वाढण्याची भीती बाजारात निर्माण झाली आहे. याचा परिणाम म्हणून विदेशी वित्तीय संस्था आपली गुंतवणूक काढून घेत आहेत. त्यामुळे बाजार घसरणीला लागला आहे.
आजच्या घसरणीसह ३0 कंपन्यांचा समावेश असलेल्या सेन्सेक्सने गेल्या सहा दिवसांत १,३७0 अंकांची घसरण नोंदविली आहे. हे प्रमाण तब्बल ४.९१ टक्के आहे. या आधी फेब्रुवारीमध्ये सेन्सेक्स सलग सात सत्रांत घसरला होता. ३ फेब्रुवारी रोजी जारी झालेल्या दुमाही आढाव्यानंतर बाजार घसरणीला लागला होता.
गेल्या मंगळवारपासून बाजार सातत्याने घसरत आहेत. त्या दिवशी रिझर्व्ह बँकेने दुमाही आढावा जारी करताना रेपो दरात २५ आधार अंकांची घट केली होती. मात्र, नेमके याच दिवशी हवामान खात्याने यंदा कमी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सलग सातव्या सत्रात घसरला आहे. २१.७५ अंकांनी अथवा 0.२७ टक्क्यांनी घसरलेला निफ्टी ८,0२२.४0 अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्ससाठी आजचा दिवस खूपच अस्थिर राहिला. तो दिवसभर २६,४३८.३२ आणि २६,६0४.६५ अंकांच्या मध्ये खाली-वर होताना दिसून आला. सत्राच्या अखेरीस तो ४१.८४ अंक अथवा 0.१६ टक्के घसरून २६,४८१.२५ अंकांवर बंद झाला. ही सेन्सेक्सची गेल्या आठ महिन्यांतील सर्वांत नीचांकी पातळी ठरली आहे. आजच्या घसरणीत सिप्लाला सर्वाधिक ३.३५ टक्क्यांचा फटका बसला. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांत सिप्लाचा समभाग सर्वाधिक घसरला. या उलट वेदांताचे समभाग सेन्सेक्समध्ये सर्वाधिक ३.११ टक्क्यांनी वाढले.
दबावात असलेल्या नेस्ले इंडियाचे समभाग आजच्या घसरणीच्या वातावरणातही अचानक वाढले. ७.४७ टक्क्यांची वाढ नोंदवून ५,९५३.८0 अंकांवर बंद झाला.

> मुंबई शेअर बाजारात रिअल्टी क्षेत्राचा निर्देशांक सर्वाधिक १.५४ टक्क्यांनी घसरला. त्याखालोखाल आरोग्य १.४१ टक्के, वाहन 0.७३ टक्के, आयटी 0.७0 टक्के, भांडवली वस्तू 0.३५ टक्के, तेल आणि गॅस 0.0४ टक्के आणि एफएमसीजी 0.0३ टक्के घसरले.
> तत्पूर्वी काल विदेशी संस्थांनी ७४९.१२ कोटी रुपयांचे समभाग विकले होते. दुसरीकडे आशियाई बाजारांत घसरणीचा कल दिसून आला. युरोपीय बाजारही सकाळी घसरणीचा कल दर्शवीत होते.

Web Title: The Sensex of the Bombay Stock Exchange declined for the sixth straight session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.