Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेंसेक्सची भरारी, पहिल्यांदाच ओलांडला २८ हजारचा टप्पा

सेंसेक्सची भरारी, पहिल्यांदाच ओलांडला २८ हजारचा टप्पा

सेंसेक्सच्या निर्देशांकाने बुधवारी ऐतिहासिक भरारी घेत पहिल्यांदाच २८ हजारचा टप्पा ओलांडला आहे. तर निफ्टीनेही ८.३६३ अंशांपर्यंत झेप घेतली आहे.

By admin | Updated: November 5, 2014 12:38 IST2014-11-05T11:32:19+5:302014-11-05T12:38:46+5:30

सेंसेक्सच्या निर्देशांकाने बुधवारी ऐतिहासिक भरारी घेत पहिल्यांदाच २८ हजारचा टप्पा ओलांडला आहे. तर निफ्टीनेही ८.३६३ अंशांपर्यंत झेप घेतली आहे.

Sensex bari, first phase crosses 28 thousand | सेंसेक्सची भरारी, पहिल्यांदाच ओलांडला २८ हजारचा टप्पा

सेंसेक्सची भरारी, पहिल्यांदाच ओलांडला २८ हजारचा टप्पा

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ५ -  सेंसेक्सच्या निर्देशांकाने बुधवारी ऐतिहासिक भरारी घेत पहिल्यांदाच २८ हजारचा टप्पा ओलांडला आहे. तर निफ्टीनेही ८.३६३ अंशांपर्यंत झेप घेतली आहे. 
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये झालेली घट,  गुंतवणुकीमध्ये झालेली वाढ आणि कंपन्यांचे चांगले तिमाही परिणाम यामुळे शेअर बाजारात सध्या 'अच्छे दिन' आल्याचे दिसत आहे. बुधवारी शेअर बाजार सुरु होताच निर्देशांकाने १४१ अंकाची झेप घेत २८ हजारचा टप्पा ओलांडला. तर निफ्टीमध्येही ३९ अंकांनी वाढ झाली आहे. देशामध्ये केंद्र सरकारतर्फे सुरु असलेल्या आर्थिक सुधारणांमुळे शेअर बाजारात गेल्या काही आठवड्यांपासून तेजी आली आहे. टीसीएस, बजाज ऑटो, टाटा ऑटो, सन फार्मा, सिप्ला या कंपन्यामध्ये गुंतवणूकदारांचा कल जास्त असल्याचे जाणकारांनी सांगितले. 

Web Title: Sensex bari, first phase crosses 28 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.