मुंबई : ठोक क्षेत्रतील महागाईचा दर घसरल्याने शुक्रवारी शेअर बाजारात उत्साहाचे वारे संचारले आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 106.02 अंकांनी उसळून 28,046.66 अंकांवर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी 32.05 अंकांनी वर चढून 8,389.90 अंकांवर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांचा उच्चंक झाला आहे.
रिअल्टी, धातू आणि रिफायनरी क्षेत्रतील कंपन्यांना तेजीचा लाभ मिळाला. या तेजीला महागाईच्या दरातील घट हेच मुख्य कारण होते. ऑक्टोबर महिन्यातील ठोक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर 1.77 टक्क्यांवर आला आहे. हा पाच वर्षाचा नीचांक ठरला आहे. सप्टेंबरमध्येतो 2.38 टक्के होता, तर ऑक्टोबर 2013 मध्ये 7.24 टक्के होता. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर घसरल्यानंतर ही आकडेवारी आली आहे.
बाजारातील सूत्रंनी सांगितले की, डिसेंबरमध्ये रिझव्र्ह बँकेकडून पतधोरणाचा आढावा घेतला जाईल. अर्थव्यवस्था सकारात्मक मार्गावर असल्यामुळे धोरणात्मक व्याज दरात 25 बेसिक पॉइंटची कपात होऊ शकते. आज दिवसभर बाजारात पोषक बातम्या येत होत्या. काल विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 690.61 कोटी रुपयांची शेअर खरेदी केली. सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत बँक ऑफ इंडियाच्या नफ्यात 30.5 टक्के वाढ झाली आहे. या काळात कंपनीला 3,100.41 कोटी रुपयांचा नफा झाला. याचा परिणाम होऊन बँकेचे समभाग 2.55 टक्क्यांनी वाढले.
30 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी 27,949.54 अंकांवर उघडला. नंतर तो 28,093.23 अंकांर्पयत वर चढला. दिवस अखेरीस 28,046.66 अंकांवर बंद झाला. 106.02 अंकांची अथवा 0.38 टक्क्यांची वाढ सेन्सेक्सने नोंदविली.
50 कंपन्यांचा समावेश असलेला नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा सीएनएक्स निफ्टी 32.05 अथवा 0.38 टक्क्यांच्या वाढीसह 8,389.90 अंकांवर बंद झाला. त्या आधी तो 8,400.65 अंकांर्पयत वर चढला होता. हिंदाल्को, कोल इंडिया, एसबीआय, गेल, ओएनजीसी, टाटा स्टील, सेसा स्टरलाईट, बजाज ऑटो, एचडीएफसी बँक, हीरो मोटोकॉर्प, विप्रो आणि टीसीएस या कंपन्यांना तेजीचा लाभ मिळाला. या उलट सिप्ला, सन फार्मा, डॉ. रेड्डीज लॅब, एचयूएल, टाटा मोटर्स, भारती एअरटेल या कंपन्यांचे शेअर्स खाली आले. (प्रतिनिधी)
4आशियाई बाजारात संमिश्र कल दिसून आला. हाँगकाँग, जपान, सिंगापूर आणि तैवान येथील बाजारात 0.02 टक्के ते 0.56 टक्के घसरण झाली.
4चीन आणि दक्षिण कोरियाचे बाजार मात्र 0.27 टक्के ते 0.78 टक्क्यांनी घसरले.
4युरोपीय बाजारात सकाळच्या सत्रत संमिश्र कल दिसून आला. जर्मनी आणि ब्रिटनचे बाजार 0.13 टक्के ते 0.27 टक्क्यांर्पयत घसरण दर्शवीत होते. फ्रान्सचा सीएसी 0.12 टक्क्यांर्पयत तेजी दर्शवीत होता.
4बाजाराचा एकूण विस्तार सकारात्मक राहिला. 1,581 कंपन्यांचे समभाग वाढले, तर 1,450 कंपन्यांचे समभाग घसरले. 117 कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजारातील एकूण उलाढाल 3,456.37 कोटी रुपये राहिली. आदल्या सत्रत ती 3,529.31 कोटी रुपये होती.