Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारात उसळण, सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारला

शेअर बाजारात उसळण, सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारला

मंगळवारी सकाळी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी वाढून २३ हजार ५०९ वर पोहोचला.

By admin | Updated: March 1, 2016 11:21 IST2016-03-01T11:21:01+5:302016-03-01T11:21:27+5:30

मंगळवारी सकाळी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी वाढून २३ हजार ५०९ वर पोहोचला.

Sensex up 500 points in early trade | शेअर बाजारात उसळण, सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारला

शेअर बाजारात उसळण, सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारला

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - काल अर्थमंत्री अरूण जेटलींनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर कोसळलेला शेअर बाजार मंगळवारी बाजार उघडताना मात्र सावरला असून आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक ५०० हून अधिक अंकांनी वाढून २३ हजार ५०९ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही १५० हून अधिक अंकांनी उसळण मारत ७१३९चा टप्पा गाठला.
तर रुपयानेही सलग तिस-या सत्रात वाढ नोंदवली असून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत मंगळवारी सकाळी रुपया १८ पैशांनी वाढून ६८.२४ वर स्थिरावला.
 

Web Title: Sensex up 500 points in early trade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.