Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स ३३ अंकांनी वाढला; निफ्टीची घसरण

सेन्सेक्स ३३ अंकांनी वाढला; निफ्टीची घसरण

शेअर बाजारातील दोन दिवसांच्या घसरणीला बुधवारी ब्रेक लागला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३३ अंकांनी वाढून २७,५६४.६६ अंकांवर बंद झाला.

By admin | Updated: May 27, 2015 23:40 IST2015-05-27T23:40:22+5:302015-05-27T23:40:22+5:30

शेअर बाजारातील दोन दिवसांच्या घसरणीला बुधवारी ब्रेक लागला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३३ अंकांनी वाढून २७,५६४.६६ अंकांवर बंद झाला.

Sensex up 33 points; Nifty Fall | सेन्सेक्स ३३ अंकांनी वाढला; निफ्टीची घसरण

सेन्सेक्स ३३ अंकांनी वाढला; निफ्टीची घसरण

मुंबई : शेअर बाजारातील दोन दिवसांच्या घसरणीला बुधवारी ब्रेक लागला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३३ अंकांनी वाढून २७,५६४.६६ अंकांवर बंद झाला. वाहन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांत मोठ्या प्रमाणात विक्रीचा मारा झाल्याने सेन्सेक्सच्या वाढीला ब्रेक लावला. या उलट बँकिंग क्षेत्रातील तेजीने बाजाराला तारले.
सेन्सेक्स सकाळी २७,४४७.४0 अंकांवर मंदीने उघडला. त्यानंतर तो आणखी घसरून २७,३६३.७२ अंकांवर बंद झाला. संपूर्ण सत्रात तो नकारात्मक मूडमध्येच होता. मात्र, शेवटच्या अर्ध्या तासात बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. त्यामुळे सेन्सेक्स वर चढला. ३३.२५ अंकांची अथवा 0.१२ टक्क्यांची वाढ नोंदवून सेन्सेक्स २७,५६४.६६ अंकांवर बंद झाला. आधीच्या दोन सत्रांत सेन्सेक्सने ४२६.0९ अंक गमावले आहेत.
५0 कंपन्यांच्या व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४.७५ अंकांनी अथवा 0.0६ टक्क्यांनी घसरून ८,३३४.६0 अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्समधील अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय यांचे समभाग २.२६ टक्के ते १.२३ टक्के वाढले.
आशियाई बाजारात संमिश्र कल दिसून आला. चीन, जपान, तैवान येथील बाजार 0.२५ टक्के ते 0.६३ टक्के वाढले. हाँगकाँग, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया येथील बाजार 0.६0 टक्के ते १.६८ टक्के घसरले.
युरोपीय बाजारांत सकाळी तेजीचे वातावरण दिसून आले. ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी येथील बाजार 0.१९ टक्के ते 0.६३ टक्के तेजीत
होते. (वृत्तसंस्था)

४सेन्सेक्समधील ३0 पैकी १७ कंपन्यांचे समभाग वाढले. तेजीचा लाभ मिळालेल्या कंपन्यांत भेल, ओएनजीसी, कोल इंडिया, भारती एअरटेल, एनटीपीसी, आयटीसी, टाटा पॉवर आणि एलअँडटी यांचाही समावेश आहे.
४बाजाराची एकूण व्याप्ती नकारात्मक राहिली. १,४३५ बँकांचे समभाग घसरले. १,१९६ बँकांचे समभाग वाढले. १0९ बँकांचे समभाग स्थिर राहिले. बाजारातील एकूण उलाढाल वाढून २,७६९.६६ कोटी झाली. आदल्या सत्रात ती २,४३६.३३ कोटी होती.

Web Title: Sensex up 33 points; Nifty Fall