मुंबई : भारतीय शेअर बाजारांनी गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी तेजीचा अनुभव घेतला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २७१ अंकांनी वाढून २८,८0५.१0 अंकांवर पोहोचला. निफ्टीने ८४ अंकांची वाढ मिळवून ८,७00 अंकांचा टप्पा पार केला.
युरोपीय बाजारात सकारात्मक कल राहिल्यामुळे भारतीय बाजारांना बळ मिळाले आहे. स्वीडनच्या सेंट्रल बँकेने जाहीर केलेले प्रोत्साहन पॅकेज आणि रशिया-युक्रेन यांच्यात झालेली शस्त्रसंधी याबाबीही बाजारासाठी अनुकूल ठरल्या.
सकाळी सेन्सेक्स तेजीसह २८,६५0.२५ अंकांवर उघडला. त्यानंतर तो २८,८३८.५२ आणि २८,४0६.२५ अंकांच्या मध्ये झुलत राहिला. सत्र अखेरीस २७१.१३ अंकांची वाढ नोंदवून २८,८0५.१0 अंकांवर बंद झाला. ही वाढ 0.९५ टक्के इतकी आहे. गेल्या तीन दिवसांत सेन्सेक्सने ५७७.७१ अंकांची वाढ नोंदविली आहे. ही वाढ २.0५ टक्के इतकी आहे.
५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८४.१५ अंकांनी अथवा 0.९८ अंकांनी वाढून ८,७११.५५ अंकांवर बंद झाला.
दिल्लीतील अपयशानंतरही आर्थिक सुधारणा सुरूच राहतील, असे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले आहे. त्यामुळे बाजारात आशादायक वातावरण निर्माण झाले, असे ब्रोकरांनी सांगितले.
युरोपीय बाजार सकाळच्या सत्रात तेजी दर्शवीत होते. ब्रिटनचा एफटीएसई-१00 हा निर्देशांक 0.३६ टक्क्यांनी तेजीत होता. त्याचप्रमाणे फ्रान्सचा सीएसी-४0 हा 0.६७ टक्क्यांनी आणि जर्मनीचा डीएएक्स हा १.२३ टक्क्यांनी तेजीत होता.
आशियाई बाजारात संमिश्र कल दिसून आला. चीन, तैवान, हाँगकाँग आणि जपान येथील बाजार 0.३६ टक्के ते १.८५ टक्के वर चढले. या उलट सिंगापूर आणि दक्षिण कोरिया येथील बाजार 0.२१ टक्के ते 0.७४ टक्के घसरले.
बाजाराची एकूण व्याप्ती सकारात्मक राहिली. १,६१६ कंपन्यांचे समभाग वाढले. १,२२९ कंपन्यांचे समभाग घसरले. १२६ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजाराची एकूण उलाढाल वाढून ३,८४२.४८ कोटी रुपये झाली. काल ती ३,२६९.७७ कोटी होती.
दरम्यान, काल विदेशी संस्थांनी ३७१.२७ कोटी रुपयांचे समभाग विकले. देशांतर्गत संस्थांनी १४७.४९ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. मुंबई शेअर बाजारात जारी करण्यात आलेल्या तात्पुरत्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.
सेन्सेक्स २७१ अंकांनी वाढला; निफ्टीही तेजीत
भारतीय शेअर बाजारांनी गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी तेजीचा अनुभव घेतला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २७१ अंकांनी वाढून
By admin | Updated: February 12, 2015 23:37 IST2015-02-12T23:37:36+5:302015-02-12T23:37:36+5:30
भारतीय शेअर बाजारांनी गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी तेजीचा अनुभव घेतला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २७१ अंकांनी वाढून
