Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स २७१ अंकांनी उसळला

सेन्सेक्स २७१ अंकांनी उसळला

गेल्या ४ दिवसांतील घसरणीला ब्रेक लावताना भारतीय शेअर बाजार गुरुवारी उसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २७१.२४ अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी

By admin | Updated: March 13, 2015 00:28 IST2015-03-13T00:28:30+5:302015-03-13T00:28:30+5:30

गेल्या ४ दिवसांतील घसरणीला ब्रेक लावताना भारतीय शेअर बाजार गुरुवारी उसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २७१.२४ अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी

Sensex up 271 points | सेन्सेक्स २७१ अंकांनी उसळला

सेन्सेक्स २७१ अंकांनी उसळला

मुंबई : गेल्या ४ दिवसांतील घसरणीला ब्रेक लावताना भारतीय शेअर बाजार गुरुवारी उसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २७१.२४ अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७६.0५ अंकांनी वर चढला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर अंदाज वाढविल्यामुळे बाजारात जान आली आहे.
अमेरिकेतील बेरोजगारी घटल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे बाजारात घसरण सुरू झाली होती. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या अंदाजाने या घसरणीला ब्रेक लागला आहे.
मुंबई शेअर बाजारात सकाळपासूनच तेजी दिसून आली. २८,७९८.६१ अंकांवर उघडलेला बाजार २८,९७१.0१ अंकांपर्यंत वर चढला होता. नंतर तो २८,७७२.७१ अंकांपर्यंत खालीही आला. दिवसभर तो खाली-वर होताना दिसून आला. तथापि, सत्र अखेरीस २८,९३0.४१ अंकांवर बंद झाला. २७१.२४ अंकांची अथवा 0.९५ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा सीएनएक्स निफ्टी ७६.0५ अंकांनी अथवा 0.८७ टक्क्यांनी वाढून ८,७७६.00 अंकांवर बंद झाला.
बँक आॅफ कोरियाने व्याजदरात पाच महिन्यांत प्रथमच २५ बेसिक पॉइंटांची कपात केली आहे. त्याचा परिणाम म्हणून आशियाई बाजारात चांगली खरेदी दिसून आली. चीन, हाँगकाँग, जपान, तैवान येथील बाजार 0.३४ टक्के ते १.७८ टक्के वाढले. सिंगापूर आणि दक्षिण कोरियाचे बाजार 0.३८ टक्के ते 0.५२ टक्के वाढले.
युरोपीय बाजारात मात्र सकाळी घसरणीचा कल दिसून आला. फ्रान्सचा सीएसी 0.१९ टक्क्यांनी, जर्मनीचा डीएएक्स 0.२९ टक्क्यांनी तर ब्रिटनचा एफटीएसई 0.८७ टक्क्यांनी वाढला. (वृत्तसंस्था)

Web Title: Sensex up 271 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.