मुंबई : सुमारे २४१ अंकांच्या वाढीनंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दोन महिन्यांच्या उच्चांकावर गेला आहे. व्यापक खरेदीमुळे बाजारात तेजी आली आहे. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स २४0.८५ अंकांनी अथवा 0.९0 टक्क्यांनी वाढून २७,१४0.४१ अंकांवर बंद झाला. १0 नोव्हेंबरनंतरचा हा उच्चांक ठरला आहे. त्यादिवशी सेन्सेक्स २७,५१७.६८ अंकांवर बंद झाला होता.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा ५0 कंपन्यांचा निफ्टी ९२.0५ अंकांनी अथवा १.११ टक्क्यांनी वाढून ८,३८0.६५ अंकांवर बंद झाला. बीएसई मीडकॅप १.३७ टक्क्यांनी, तर बीएसई स्मॉलकॅप 0.९८ टक्क्यांनी वाढला. सेन्सेक्समधील ३0 पैकी २३ कंपन्यांचे समभाग वाढले. ७ कंपन्यांचे समभाग घसरले. तेजीसह बंद झालेल्या बड्या कंपन्यांत कोल इंडिया, टाटा स्टील, लुपीन, एलअँडटी, आयसीआयसीआय बँक, पॉवर ग्रीड, एचडीएफसी बँक, एसबीआय, सन फार्मा, अॅक्सिस बँक आणि मारुती सुझुकी यांचा समावेश आहे. बजाज आॅटो, आयटीसी, लियन्स, ओएनजीसी आणि इन्फी यांचे समभाग घसरले.
२४१ अंकांनी सेन्सेक्स तेजीत
सुमारे २४१ अंकांच्या वाढीनंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दोन महिन्यांच्या उच्चांकावर गेला आहे. व्यापक खरेदीमुळे बाजारात तेजी आली आहे.
By admin | Updated: January 12, 2017 00:40 IST2017-01-12T00:40:53+5:302017-01-12T00:40:53+5:30
सुमारे २४१ अंकांच्या वाढीनंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दोन महिन्यांच्या उच्चांकावर गेला आहे. व्यापक खरेदीमुळे बाजारात तेजी आली आहे.
