Lokmat Money > बिझनेस न्यूज > १९0 अंकांनी वाढला सेन्सेक्स

१९0 अंकांनी वाढला सेन्सेक्स

इन्फोसिसचा तिमाही निकाल उत्साहवर्धक राहिल्यामुळे सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १९0 अंकांनी वाढून २५,८१६ अंकांवर पाहोचला.

By admin | Updated: April 19, 2016 03:03 IST2016-04-19T03:03:51+5:302016-04-19T03:03:51+5:30

इन्फोसिसचा तिमाही निकाल उत्साहवर्धक राहिल्यामुळे सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १९0 अंकांनी वाढून २५,८१६ अंकांवर पाहोचला.

Sensex up 190 points | १९0 अंकांनी वाढला सेन्सेक्स

१९0 अंकांनी वाढला सेन्सेक्स

मुंबई : इन्फोसिसचा तिमाही निकाल उत्साहवर्धक राहिल्यामुळे सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १९0 अंकांनी वाढून २५,८१६ अंकांवर पाहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ७,९00 अंकांचा टप्पा ओलांडून पुढे गेला.
इन्फोसिसच्या बळावर आयटी क्षेत्रातील कंपन्यांचा निर्देशांक ५.७0 टक्क्यांनी वाढून ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. सेन्सेक्स सकाळपासूनच तेजीत होता. सत्राच्या अखेरीस तो १८९.६१ अंकांनी अथवा 0.७४ टक्क्यांनी वाढून २५,८१६.३६ अंकांवर बंद झाला. १ जानेवारीनंतरचा हा सर्वोच्च बंद आहे. सेन्सेक्सने गेल्या तीन सत्रांत ९५२.९१ अंकांची वाढ मिळविली आहे. सेन्सेक्समधील ३0 पैकी १६ कंपन्यांचे समभाग वाढले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६४.२५ अंकांनी अथवा 0.८२ टक्क्यांनी वाढून ७,९१४.७0 अंकांवर बंद झाला. बीएसई रिअल्टी निर्देशांक सर्वाधिक ४.४0 टक्क्यांनी वाढला.


 

Web Title: Sensex up 190 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.