Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स १७ महिन्यांच्या उच्चांकावर

सेन्सेक्स १७ महिन्यांच्या उच्चांकावर

हन आणि जमीन जुमला क्षेत्रातील कंपन्यांत मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी सुमारे ११९ अंकांनी वाढून १७ महिन्यांच्या उच्चांकावर गेला

By admin | Updated: September 9, 2016 04:52 IST2016-09-09T04:52:54+5:302016-09-09T04:52:54+5:30

हन आणि जमीन जुमला क्षेत्रातील कंपन्यांत मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी सुमारे ११९ अंकांनी वाढून १७ महिन्यांच्या उच्चांकावर गेला

Sensex at 17-month high | सेन्सेक्स १७ महिन्यांच्या उच्चांकावर

सेन्सेक्स १७ महिन्यांच्या उच्चांकावर

मुंबई : वाहन आणि जमीन जुमला क्षेत्रातील कंपन्यांत मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी सुमारे ११९ अंकांनी वाढून १७ महिन्यांच्या उच्चांकावर गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सुमारे ३५ अंकांनी वाढला.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स थोड्या चांगल्या पातळीवर उघडला होता. नंतर त्यात चढ-उतार पाहायला मिळाले. तथापि, सत्राच्या अखेरीस तो ११८.९२ अंकांची अथवा 0.४१ टक्क्याची वाढ नोंदवून २९,0४५.२८ अंकांवर बंद झाला. १३ एप्रिल २0१५ नंतरचा हा सर्वोच्च बंद ठरला. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला निफ्टी ३४.५५ अंकांनी वाढून ८,९५२.५0 अंकांवर बंद झाला.
वाहन विक्रीची आॅगस्टमधील आकडेवारी उत्साहवर्धक असल्यामुळे बाजारात तेजी परतली आहे, असे सूत्रांनी सांगितले. आशियाई बाजारात संमिश्र कल पाहायला मिळाला. हाँगकाँग आणि शांघाय येथील बाजार अनुक्रमे 0.७५ टक्काआणि 0.१३ टक्का वाढले.
जपानचा निक्केई मात्र 0.३२ टक्क्याने घसरला. युरोपीय बाजारांतही सकाळी संमिश्र कल होता. ब्रिटनचा एफटीएसई 0.३५ टक्क्याने वाढला. जर्मनीचा डॅक्स 0.१९, तर फ्रान्सचा कॅक-४0 निर्देशांक 0.0६ टक्क्याने घसरला.सेन्सेक्समधील ३0 पैकी २२ कंपन्यांचे समभाग वाढले. बड्या लाभधारक कंपन्यांत सन फार्मा, टाटा स्टील, लुपीन, हीरोमोटोकॉर्प, एचयूएल, सिप्ला, रिलायन्स इंडस्ट्रीज, डॉ. रेड्डीज, आयटीसी आणि एल अँड टी यांचा समावेश आहे.
घसरण सोसावी लागलेल्या कंपन्यांत गेल, एनटीपीसी आणि आयसीआयससीआय बँक यांचा समावेश आहे. आयटी कंपन्यांचे समभाग घसरले. टीसीएसचे समभाग सर्वाधिक ५.१४ टक्क्यांनी घसरले. विप्रो आणि इन्फोसिस यांनाही फटका बसला. मारुतीचा समभाग २.७१ टक्क्यांनी वाढून ५,४८२.४0 रुपयांवर बंद झाला. हा कंपनीचा सार्वकालिक सर्वोच्च बंद आहे. (प्रतिनिधी)


सोन्याच्या भावात घसरण
दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोने २५0 रुपयांनी घसरून ३१,३00 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. चांदीचा भाव मात्र ५0 रुपयांनी वाढून ४७ हजार रुपये किलो झाला. काल सोने ६00 रुपयांनी वाढून ३0 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर गेले होते. ज्वेलरांनी खरेदीत आखडता हात घेतल्यामुळे सोने घसरल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले. न्यूयॉर्कच्या बाजारात सोने 0.३३ टक्क्याने घसरून १,३४५ डॉलर प्रति औंस झाले. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी २५0 रुपयांनी घसरून अनुक्रमे ३१,३00 रुपये आणि ३१,१५0 रुपये तोळा झाला.

Web Title: Sensex at 17-month high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.