मुंबई : अत्यंत अस्थिर राहिलेला सेन्सेक्स ४५ अंकांनी घसरला. याबरोबर शेअर बाजारात सलग दुसऱ्या आठवड्यात घसरण नोंदली गेली आहे.
सेन्सेक्स दिवसभर खाली-वर होताना दिसून आला. एका क्षणी तो २६,७१८.४४ अंकांपर्यंत खाली गेला होता. त्यानंतर मात्र अचानक तेजीचे वारे सुरू झाले. सेन्सेक्स २७ हजार अंकांच्या वर चढला. मान्सून केरळला पोहोचल्याच्या बातमीने ही तेजी आली होती. तथापि, ती फार काळ टिकू शकली नाही. पुन्हा विक्रीचा जोरदार मारा झाला आणि मिळविलेले सर्व अंक सेन्सेक्सने गमावले. सत्रअखेरीस ४४.९३ अंकांची अथवा 0.१७ टक्क्यांची घसरण नोंदवून तो २६,७६८.४९ अंकांवर बंद झाला.
गेल्या चार दिवसांपासून सेन्सेक्स घसरत आहे. या चार दिवसांत सेन्सेक्सने १,0८0.५0 अंक गमावले आहेत.
५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५.९५ अंकांनी अथवा 0.२0 टक्क्यांनी घसरून ८,११४.७0 अंकांवर बंद झाला. तत्पूर्वी, तो दिवसभर ८,१९१.00 अंक ते ८,१00.१५ अंक यादरम्यान खाली-वर होताना दिसून आला.सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक सलग दुसऱ्या सप्ताहात घसरले आहेत.
सेन्सेक्समधील आयसीआयसीआय बँकेचा समभाग सर्वाधिक २.१८ टक्क्यांनी घसरला. २.११ टक्क्यांच्या घसरणीसह टाटा मोटर्स दुसऱ्या क्रमांकावर राहिली. याशिवाय एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, टीसीए, सिप्ला, हिंदाल्को, इन्फोसिस, भेल, आरआयएल, वेदांता, बजाज आॅटो, मारुती सुझुकी, भारती एअरटेल, एचडीएफसी आणि डॉ रेड्डीज या कंपन्यांचे समभागही घसरले. या घसरणीच्या या वातावरणात कोल इंडियाचा समभाग ४.४४ टक्क्यांनी वाढला.
सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी १६ कंपन्यांचे समभाग घसरले. १४ कंपन्यांचे समभाग वाढले. रिअल्टी क्षेत्राचा निर्देशांक सर्वाधिक १.४४ टक्क्यांनी घसरला. त्याखालोखाल बँकेक्स 0.९३ टक्के, आयटी 0.८0 टक्के, वाहन 0.६0 टक्के आणि टेक 0.४६ टक्के घसरला.
४मॅगी नूडल्सच्या वादामुळे नेस्लेचा समभाग सलग दुसऱ्या दिवशी घसरला. आज 0.२३ टक्क्यांच्या घसरणीसह नेस्लेचा समभाग ५,९९७.१0 अंकांवर आला. नेस्लेने मॅगी बाजारातून परत घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
शेअर बाजारात मंदीचा सलग दुसरा सप्ताह
अत्यंत अस्थिर राहिलेला सेन्सेक्स ४५ अंकांनी घसरला. याबरोबर शेअर बाजारात सलग दुसऱ्या आठवड्यात घसरण नोंदली गेली आहे.
By admin | Updated: June 6, 2015 00:03 IST2015-06-06T00:03:24+5:302015-06-06T00:03:24+5:30
अत्यंत अस्थिर राहिलेला सेन्सेक्स ४५ अंकांनी घसरला. याबरोबर शेअर बाजारात सलग दुसऱ्या आठवड्यात घसरण नोंदली गेली आहे.
