- मनोज गडनीस, मुंबई
गरज अथवा चैन, पण स्वत:चे वाहन असावे असे स्वप्न बाळगणारे वाहनप्रेमी वाहन खरेदी करताना सेकंड हँड गाडी खरेदीस प्राधान्य देत असून सरत्या आर्थिक वर्षात देशात तब्बल १० लाख सेकंड हँड गाड्यांची विक्री झाल्याची माहिती आहे. या अंतर्गत सरत्या वर्षात अंदाजे ६५ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याचाही अंदाज वर्तविला जात आहे. विक्रीची ही आकडेवारी केवळ मारुती, महिन्द्रासारख्या कंपन्या, ज्या सेकंड हँड गाड्यांच्या विक्रीतही अग्रेसर आहेत, त्यांची आहे. यामध्ये ओळखीत अथवा छोट्या दुकानांतून होणाऱ्या व्यवहारांचा समावेश नाही. त्यामुळे प्रत्यक्षात हा आकडा आणखी किमान दीड ते दोन लाखांनी अधिक असेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मारुती, महिन्द्रा, टाटा, ह्युंदाई, जनलर मोटर्स, होन्डा, फोर्ड, टोयोटा अशा सर्वच प्रमुख वाहन कंपन्यांनी सेकंड हँड वाहनाच्या बाजारपेठेत प्रवेश केला. सेकंड हँड गाड्यांची विक्री करताना या कंपन्यांनी विक्री करण्यात येणारे वाहन तांत्रिकदृष्ट्या फिट करतानाच या वाहनासाठी सहा महिने ते एक वर्षाची वॉरन्टी देण्यास सुरवात केली. तसेच या वाहनांची खरेदी सुलभतेने करता यावी म्हणून बँका व वित्तीय कंपन्यांशी करारबद्ध होत सुलभ कर्जाची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. याचा मोठा फायदा सेकंड हँड गाड्यांच्या बाजारात तेजी निर्माण होण्याच्या रुपाने दिसून आला आहे.
क्रिसिल या आंतरराष्ट्रीय आर्थिक विश्लेषण संस्थेने या संदर्भात केलेल्या अभ्यासानुसार, वाहन खरेदीसाठी इच्छुक लोकांपैकी, पहिले वाहन खरेदी करणारे १० पैकी किमान ५ लोक सेंकड हँड गाडीला प्राधान्य देतात. तर पहिले वाहन घेतल्यानंतर दुसरे वाहन घेणाऱ्या लोकांनाही जर आधीच्या वाहनाच्या वरचे मॉडेल घ्यायचे असेल तर किंवा महागड्या किंमतीचे वाहन खरेदी करायचे असेल तर असे लोक नव्या गाडीऐवजी सेकंड गाड्यांना प्राधान्य देताना दिसत आहेत. गेल्यापाच वर्षांत सेकंड हँड गाड्यांच्या बाजारात सरासरी १२ टक्के दराने वाढ नोंदली गेली आहे.
मारुतीने विकल्या सव्वा चार लाख गाड्या
गेल्या पाच वर्षाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर देशात सेकंड हँड वाहनांची विक्री करणाऱ्या (वाहन कंपन्यांच्या) दुकानांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. नव्या गाड्यांसोबत सेकंड हँड वाहनांच्या विक्रीत मारुती कंपनी देशात अग्रेसर आहे.
केवळ मारुतीच्याच आकडेवारीवर नजर टाकली तर २०११-१२ मध्ये देशात कंपनीची ‘ट्रू व्हॅल्यू’ या नावाने ४०९ दुकाने होती. सरत्या पाच वर्षात ही संख्या आता १०४६ झाली आहे. एकट्या मारुतीनेच सरत्या वर्षात चार लाख २२ हजार सेकंड हँड वाहनांची विक्री केली आहे.
सेकंड हँड वाहन बाजार तेजीत
गरज अथवा चैन, पण स्वत:चे वाहन असावे असे स्वप्न बाळगणारे वाहनप्रेमी वाहन खरेदी करताना सेकंड हँड गाडी खरेदीस प्राधान्य देत असून सरत्या आर्थिक वर्षात देशात तब्बल १० लाख
By admin | Updated: April 12, 2016 02:53 IST2016-04-12T02:53:07+5:302016-04-12T02:53:07+5:30
गरज अथवा चैन, पण स्वत:चे वाहन असावे असे स्वप्न बाळगणारे वाहनप्रेमी वाहन खरेदी करताना सेकंड हँड गाडी खरेदीस प्राधान्य देत असून सरत्या आर्थिक वर्षात देशात तब्बल १० लाख
