Lokmat Money > बिझनेस न्यूज > बाजाराच्या घसरणीचा सलग दुसरा सप्ताह

बाजाराच्या घसरणीचा सलग दुसरा सप्ताह

चौथ्या तिमाहीत आस्थापनांच्या निकालांबाबत असलेले संभ्रमाचे वातावरण यामुळे मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहात घसरण झाली. बाजाराच्या पडझडीचा हा सलग दुसरा सप्ताह होता.

By admin | Updated: March 23, 2015 00:00 IST2015-03-23T00:00:54+5:302015-03-23T00:00:54+5:30

चौथ्या तिमाहीत आस्थापनांच्या निकालांबाबत असलेले संभ्रमाचे वातावरण यामुळे मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहात घसरण झाली. बाजाराच्या पडझडीचा हा सलग दुसरा सप्ताह होता.

Second consecutive week of fall in the market | बाजाराच्या घसरणीचा सलग दुसरा सप्ताह

बाजाराच्या घसरणीचा सलग दुसरा सप्ताह

अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ होण्याच्या शक्यतेने बाजारातील सर्वच घटकांनी स्वीकारलेला सावध पवित्रा, वाढीव किंमतींचा फायदा घेत नफा कमविण्यासाठी बाजारात झालेली मोठी विक्री आणि आगामी काळात चौथ्या तिमाहीत आस्थापनांच्या निकालांबाबत असलेले संभ्रमाचे वातावरण यामुळे मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहात घसरण झाली. बाजाराच्या पडझडीचा हा सलग दुसरा सप्ताह होता.
मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहात मंदीवाल्यांचा म्हणजेच अस्वलाचा जोर दिसून आला. मंगळवारचा अपवाद वगळता बाजार सातत्याने घसरताना दिसून आला. परकीय वित्तसंस्थांनी खरेदीचा जोर लावला असला तरी नफा कमविण्यासाठी झालेल्या मोठ्या विक्रीपुढे हा जोर फिका पडला आणि बाजाराने गटांगळी खाल्ली. सलग दुसऱ्या सप्ताहात बाजार खाली आला.
मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक २४२.२२ अंशांनी म्हणजेच ०.८४ टक्कयांनी खाली आला. हा निर्देशांक २८२६१.०८ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) सुद्धा ८६०० अंशांच्या खाली येऊन बंद झाला.
सप्ताहात हा निर्देशांक ०.८८ टक्के म्हणजे ७६.८५ अंशाने घसरून ८५७०.९० अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप हे दोन्ही क्षेत्रीय निर्देशांकही खाली आले. या दोन्ही निर्देशांकांमध्ये अनुक्रमे १.५७ आणि ३.१२ टक्कयांनी घट झाली.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने नियोजित वेळेपूर्वी व्याजदरामध्ये कपात करणार नसल्याचे जाहीर केल्याने बाजाराला काहीसा हुरूप आला असतानाच कदाचित मध्यावधीत व्याजदरामध्ये कपात केले जाण्याचे संकेत आल्याने बाजारातील सर्वच घटकांनी सावध पवित्रा घेतला. भारतीय शेअर बाजारातील वाढीव किंमतीचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यात आली. परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारात ८३० कोटी रुपयांची खरेदी केली मात्र बाजारात विक्रीचा जोर राहिल्याने ही खरेदी बाजाराची घसरण रोखू शकली नाही.
आस्थापनांची चौथ्या तिमाहीची आकडेवारी काहीशी निराशाजनक असण्याची भीती बाजारात व्यक्त होत आहे. यामुळेही बाजारावर विक्रीचे दडपण आले. घाऊक किंमतीवर आधारित चलनवाढीची आकडेवारी जाहीर झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किंमतींमध्ये घट झाल्याने ही चलनवाढ उणे झाली आहे.
सप्ताहामध्ये डॉलरची मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्यामुळे रुपयाची किंमत थोडीशी वाढली मात्र विक्रीरुपी त्सुनामीमध्ये ती वाहून गेली.

४अमेरिकेतील व्याजदरवाढीचा बाजाराने घेतला धसका; सर्वच जण सावध
४घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर झाला उणे
४परकीय वित्तसंस्थांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी
४स्मॉल कॅप आणि मिडकॅप निर्देशांकामध्येही झाली घट
४राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) आला ८६०० अंशांच्याही खाली

Web Title: Second consecutive week of fall in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.