नवी दिल्ली : आकर्षक परतावा देण्याची घोषणा करीत गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या १६४ योजनांची चौकशी भांडवली बाजार नियंत्रक संस्था असलेल्या सेबीने सुरू केली असून, तपासात मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पुढील कारवाई सुरू केली असल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली.
लोकसभेत या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना जेटली म्हणाले की, आकर्षक परताव्याच्या या योजनांमध्ये प्रामुख्याने चिट फंड कंपन्यांचा समावेश असून, सेबी आणि ‘सिरियल फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन आॅफिस’ (एसआयएफओ) च्या माध्यमातून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
सामान्य गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून याकरिता संबंधित कायदेही कडक करण्यात आले असल्याचे जेटली म्हणाले. कंपनी कायदा २०१३ मध्ये काही बदल करण्यात आले असून एसआयएफओला अधिक ताकद देण्यात आली आहे. याचसोबत, आर्थिक घोटाळे रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. फसव्या योजनांपासून गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्यासाठी अनेक राज्यांनीदेखील स्वत:चे कायदे केले असून, त्याद्वारेदेखील आवश्यक त्या ठिकाणी केस दाखल झाल्या आहेत.
१६४ पॉन्झी योजनांची सेबीकडून चौकशी सुरू
आकर्षक परतावा देण्याची घोषणा करीत गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या १६४ योजनांची चौकशी भांडवली बाजार नियंत्रक संस्था असलेल्या सेबीने सुरू केली असून
By admin | Updated: March 12, 2016 03:31 IST2016-03-12T03:31:17+5:302016-03-12T03:31:17+5:30
आकर्षक परतावा देण्याची घोषणा करीत गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या १६४ योजनांची चौकशी भांडवली बाजार नियंत्रक संस्था असलेल्या सेबीने सुरू केली असून
