Lokmat Money > बिझनेस न्यूज > हंगामी कर्मचारी भरती कायदा लवचिक हवा

हंगामी कर्मचारी भरती कायदा लवचिक हवा

कामगार कायद्यात व्यावहारिक सुधारणा करण्याची गरज नमूद करत मारुती सुझुकीचे भारतातील प्रमुख आर. सी. भार्गव यांनी हंगामी कामगारांबाबतचे धोरण लवचिक बनविण्याची मागणी केली आहे

By admin | Updated: August 30, 2014 03:48 IST2014-08-30T03:46:37+5:302014-08-30T03:48:51+5:30

कामगार कायद्यात व्यावहारिक सुधारणा करण्याची गरज नमूद करत मारुती सुझुकीचे भारतातील प्रमुख आर. सी. भार्गव यांनी हंगामी कामगारांबाबतचे धोरण लवचिक बनविण्याची मागणी केली आहे

Seasonal Staff Recruitment Act Flexible Wind | हंगामी कर्मचारी भरती कायदा लवचिक हवा

हंगामी कर्मचारी भरती कायदा लवचिक हवा

नवी दिल्ली : कामगार कायद्यात व्यावहारिक सुधारणा करण्याची गरज नमूद करत मारुती सुझुकीचे भारतातील प्रमुख आर. सी. भार्गव यांनी हंगामी कामगारांबाबतचे धोरण लवचिक बनविण्याची मागणी केली आहे. याबाबतच्या धोरणात मंदीदरम्यान सर्वांत शेवटी भरती करण्यात आलेल्या हंगामी कामगारांना सर्वप्रथम हटविण्याची सोय असली पाहिजे. तथापि, भविष्य निर्वाहासाठी उचित पगार असण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उल्लेखनीय म्हणजे, मारुती सुझुकीमध्ये सर्वांत शेवटी नेमण्यात आलेल्या कामगाराची कपात करण्याच्या तत्त्वाचा अवलंब अगोदरपासूनच सुरू आहे. मंदीच्या काळात कामगार कपात करणे सोयीचे व्हावे म्हणून कंपनीचा आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी २५-३० टक्के हंगामी स्वरूपाचे कर्मचारी भरण्याकडे कल आहे.
भार्गव यांनी वृत्तसंस्थेला बोलताना सांगितले की, हंगामी कर्मचाऱ्यांनी कायमस्वरूपी कामगारांच्या प्राथमिक पात्रतेच्या निकषावर नेमण्यात आले असून त्यांना त्यानुसारच प्रशिक्षित केले जाते. मंदीदरम्यान, उशिरा नेमण्यात आलेल्या व्यक्तीलाच कामावरून कमी करण्यात येते. यामध्ये कोणत्याही प्रकारचा दुजाभाव केला जात नसल्याचा दावा भार्गव यांनी केला.
कामगार कायद्यात व्यवहार्य बदल करण्याची वेळ आली असल्याचे भार्गव यांनी यावेळी नमूद केले. मागणी वाढताच कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याला कामावर परत बोलावण्यास आमचे प्राधान्य असते. शेवटच्या व्यक्तीलाच सर्वप्रथम परत घेतले जाईल. एवढेच नाहीतर विस्तार किंवा सेवानिवृत्तीमुळे जागा रिक्त झाल्यास हंगामी कर्मचाऱ्यांनाच कायमस्वरूपी म्हणून निवडण्यात येईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Seasonal Staff Recruitment Act Flexible Wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.