विशेष प्रतिनिधी/लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशातील अनेक पेट्रोलपंपांवर इलेक्ट्रॉनिक चिपद्वारे ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर हे प्रकार थांबवण्यासाठी आॅइल कंपन्यांनी इंधन भरण्याचे यंत्र सील करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे इंधन भरण्याच्या यंत्राला चिप बसविणे पेट्रोलपंपचालकांना शक्य होणार नाही.
देशभरातील असंख्य पेट्रोलपंपांवरील यंत्रांना मायक्रोचिप बसवून इंधनाची चोरी आणि ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकार अलीकडेच उघडकीस आले. डिझेल वा पेट्रोल ज्या यंत्रातून भरले जाते, त्यात चिप बसवली जात असल्याचे तपासणीमध्येही आढळून आले आहे.
अनेक ग्राहकांनीही फसवणूक झाल्याच्या तक्रारी आॅइल कंपन्यांकडे केल्या होत्या. या चिपमुळे
पंपावर आपण सांगितले, तितक्या इंधनाची नोंद होत होती आणि प्रत्यक्षात वाहनामध्ये कमी इंधन भरले जात होते.
औरंगाबाद, ठाणे, डोंबिवली तसेच उत्तर प्रदेशामध्ये हे रॅकेट मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसून आले. त्यानंतर अनेक ठिकाणी छापे घालण्यात आले होते; तसेच अनेक पेट्रोल पंप सील करण्यात आले. या प्रकरणांमध्ये काही जणांना अटकही करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील अनेक पेट्रोलपंपांवरही अशी चिप आढळली होती आणि त्यांचा संबंध महाराष्ट्राशी असल्याचे दिसून आले होते.
त्यामुळे आॅइल कंपन्यांनी पेट्रोलपंपांसाठी यंत्रसामग्री तयार करणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून ही फसवणूक थांबवण्यासाठी यंत्रांमध्ये काय बदल करता येतील, ते शक्य आहेत का, त्यासाठी किती खर्च येऊ शकतो, आदी माहिती मागविली होती.
खर्चही अतिशय कमी
कारच्या टाकीत ज्या पाइपने इंधन घातले जाते, ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सील करण्याचा पर्याय आॅइल कंपन्यांना देण्यात आला आहे. तसे केल्यास त्यात बदल करता येणार नाही आणि सील करण्याचा खर्च खूपच कमी आहे, असे स्पष्ट झाले. त्यामुळे आता पेट्रोलपंपांवरील यंत्रे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लवकरच सील केली जातील.
पेट्रोलपंपांवरील यंत्रणेला बसवणार सील; इंधनचोरीला आळा
देशातील अनेक पेट्रोलपंपांवर इलेक्ट्रॉनिक चिपद्वारे ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर हे प्रकार
By admin | Updated: July 7, 2017 01:03 IST2017-07-07T01:02:25+5:302017-07-07T01:03:33+5:30
देशातील अनेक पेट्रोलपंपांवर इलेक्ट्रॉनिक चिपद्वारे ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर हे प्रकार
