Lokmat Money > बिझनेस न्यूज > माजीमंत्री बोडखेंच्या जामिनावर शनिवारी फैसला ़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

माजीमंत्री बोडखेंच्या जामिनावर शनिवारी फैसला ़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

अकोला : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी माजी राज्यमंत्री रामदास बोडखे व इतर आरोपींनी आकोट येथील विशेष न्यायालयासमोर दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी सोमवारी पुढे ढकलण्यात आली. या प्रकरणावर आता ३० ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST2014-08-25T21:40:40+5:302014-08-25T21:40:40+5:30

अकोला : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी माजी राज्यमंत्री रामदास बोडखे व इतर आरोपींनी आकोट येथील विशेष न्यायालयासमोर दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी सोमवारी पुढे ढकलण्यात आली. या प्रकरणावर आता ३० ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

Saturday's decision on the bail of former minister Bodakh | माजीमंत्री बोडखेंच्या जामिनावर शनिवारी फैसला ़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

माजीमंत्री बोडखेंच्या जामिनावर शनिवारी फैसला ़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

ोला : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी माजी राज्यमंत्री रामदास बोडखे व इतर आरोपींनी आकोट येथील विशेष न्यायालयासमोर दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी सोमवारी पुढे ढकलण्यात आली. या प्रकरणावर आता ३० ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
माजी रोजगार हमी योजनेचे राज्यमंत्री रामदास बोडखे यांनी अवैध मार्गाने कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमविल्याची तक्रार २००७ साली लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी)विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीची चौकशी करून एसीबीने बोडखे यांच्यासह त्यांची सहा मुले आणि भावाविरूद्ध आकोट पोलिसांत गुन्हे दाखल केले. एसीबीने त्यांच्या मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली असून, पुढील तपास सुरू आहे. या कागदपत्रांच्या तपासणीमध्ये बोडखे यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे समोर आले. रामदास बोडखे, त्यांची मुले माजी नगराध्यक्ष संजय, विजय, मनोज, दीपक, प्रवीण, प्रमोद व भाऊ देवीदास बोडखे यांनी अटकपूर्व जामिनासाठी आकोट विशेष न्यायालयात धाव घेतली. या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार होती; परंतु सरकार पक्षाने त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाला वेळ वाढवून मागितली. त्यामुळे न्यायालयाने ३० ऑगस्ट रोजी सुनावणी निश्चित केली. (प्रतिनिधी)

Web Title: Saturday's decision on the bail of former minister Bodakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.