कषी क्षेत्रदेशाची संपूर्ण अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. आपला देश हा कृषिप्रधान असल्यामुळे देशातील उद्योगधंदे शेतीवर अवलंबून आहेत. शेतीशिवाय देश चालणे अशक्यच आहे; परंतु शेतकर्यांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न आहे. कर्ज काढून शेतकरी शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, खते, अवजारे, कीटकनाशके आदी घेत असतो; परंतु निसर्गाच्या लहरीमुळे वेळेवर पाऊस पडत नाही. त्यामुळे शेतकरी दुष्काळाच्या अडचणीत सापडून वर्षानुवर्षे भरडला जात आहे. मी सत्तेत आल्यानंतर शेतकर्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवीन. त्यात बी-बियाणे, खते इत्यादींचा अल्प दरात पुरवठा, तसेच सिंचनासाठी विहिरी व शेततळे जास्तीत जास्त मिळवून देण्याचा प्रयत्न करीन. पाणी अडवून ते जिरवले तरच पुढील पाणी टंचाईच्या भीषण संकटातून आपण वाचू. त्याचप्रमाणे शेतकर्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शास्त्रशुद्ध शेतीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करीन, जेणेकरून शेतकरी आपले पीक दर्जेदार पद्धतीचे घेऊन त्याच्या मालाला योग्य मागणी मिळेल. शेतकर्यांच्या मालाला योग्य किंमत मिळेल याकडे मी लक्ष देईन. शेतकर्यांच्या कष्टाचे माप त्यालाच मिळावे, त्याचप्रमाणे शेतकर्यांना शेती व शेतीशी निगडित उद्योगधंद्यांना प्रोत्साहन मिळावे, शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळावा, त्यांना कोणतीही अडचण येणार नाही याकडे माझे लक्ष असेल. शेतकर्यांचे भविष्य सुरक्षित राहावे यासाठी विमा योजनादेखील राबविण्याचा प्रयत्न करीन. शेतकर्यांच्या जे जे काही हिताचे आहे ते ते करण्याच्या वचनास मी कटिबद्ध आहे.
संजय वाघचौरे जोड-१
कृषी क्षेत्र
By admin | Updated: August 23, 2014 22:04 IST2014-08-23T22:04:24+5:302014-08-23T22:04:24+5:30
कृषी क्षेत्र
