प्रसाद गो. जोशी
अमेरिकेबरोबरचे द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होण्याच्या वृत्ताने बाजाराला मोठी उभारी मिळाल्याने निर्देशांकांनी नवीन उंची गाठली खरी, मात्र सप्ताहाच्या अखेरीस नफा कमावण्यासाठी झालेल्या मोठ्या विक्रीने ही उंची कायम राखण्यात अपयश आले. त्यामुळे सप्ताहअखेर निर्देशांक लाल रंगात गेले. काही बॅँकांचे तिमाही निकाल हे असमाधानकारक आल्याचे निमित्त बाजाराला मिळाले.
सोमवारी बाजाराला प्रजासत्ताक दिनाची सुट्टी होती. त्याचदिवशी भारत आणि अमेरिकेमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होण्याचे जाहीर झाले. त्यामुळे मंगळवारपासून बाजारात उत्साहाचे वातावरण राहिले. मात्र सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी काही बॅँकांचे तिमाही निकाल जाहीर झाले मात्र या बॅँकांच्या अनुत्पादक कर्जामध्ये वाढ झाल्याने बाजारावर विक्रीचे मोठे दडपण आले.परिणामी आधी २९८०० अंशांपर्यंत वाढलेला निर्देशांक वाहून गेला.सप्ताहाहखेरीस संवेदनशील निर्देशांक ९५.८९ अंशांनी कमी होऊन २९१८२.९५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) २६.७० अंशांनी घसरून ८८०८.९० अंशांवर बंद झाला. मिडकॅप मध्ये वाढ तर स्मॉलकॅपमध्ये घट झालेली दिसून आली. कोल इंडियातील १० टक्के हिस्सेदारी केंद्र सरकारने गतसप्ताहात विकली. त्यामुळे या आस्थापनेच्या समभागामध्ये मोठी घट झालेली दिसून आली. त्याआधी जानेवारी महिन्यासाठीची सौदापूर्ती असल्याने बाजारावर काही प्रमाणात विक्रीचे दडपण होतेच. गेल्या काही महिन्यांपासून खरेदी करीत असलेल्या परकीय वित्तसंस्थांनी गेल्या सप्ताहातही ४०२१.१३ कोटींची खरेदी केली.
सप्ताहाच्या अखेरीस अमेरिकेची रोजगार विषयक आकडेवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये झालेली वाढ ही अमेरिकन अर्थव्यवस्थेला उभारी देणारी आहे. आगामी वर्षात अमेरिका अधिक चांगली कामगिरी करण्याचा आशावाद व्यक्त होऊ लागल्याने बाजारामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
नफा कमावण्यासाठी विक्री; बाजार आला खाली
अमेरिकेबरोबरचे द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होण्याच्या वृत्ताने बाजाराला मोठी उभारी मिळाल्याने निर्देशांकांनी नवीन उंची गाठली खरी
By admin | Updated: February 2, 2015 03:48 IST2015-02-02T03:48:03+5:302015-02-02T03:48:03+5:30
अमेरिकेबरोबरचे द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होण्याच्या वृत्ताने बाजाराला मोठी उभारी मिळाल्याने निर्देशांकांनी नवीन उंची गाठली खरी
