अमेरिकेतून उगवत्या अर्थव्यवस्थांना होणाऱ्या वित्त पुरवठ्याच्या व्याजदरात होऊ घातलेली वाढ, जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीचा भारतासह अन्य देशांना बसणारा फटका या बाबींमुळे शेअर बाजारात चिंतेचे वातावरण असून, याचाच परिणाम बाजाराच्या घसरणीवर झाला आहे. सलग चौथ्या सप्ताहात मुंबई शेअर बाजाराचे निर्देशांक खाली येऊन बंद झाल्याचे दिसून आले.
मुंबई शेअर बाजारात गत सप्ताहात मंदीचेच वातावरण दिसून आले. बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकात तीन दिवस घट झालेली दिसून आली. बुधवार दिनांक १५ रोजी मतदानामुळे बाजाराला सुटी होती. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक २६१0८.५३ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये १८९ अंश म्हणजेच 0.७ टक्के घट झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) सुमारे एक टक्क्याने घसरला. हा निर्देशांक ८0 अंश खाली येऊन ७७८0 अंशांवर बंद झाला.
बाजारात केवळ चारच दिवस व्यवहार झाले. या चारही दिवशी परकीय वित्त संस्था तसेच गुंतवणुकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केली. परकीय वित्त संस्थांनी या काळामध्ये ३९२४ कोटी रुपयांची विक्री केली. जागतिक मंदीचा परिणाम भारतासह अन्य देशांच्या अर्थव्यवस्थांवर पडण्याची भीती बाजाराला वाटू लागली आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेमधील व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम परकीय वित्त संस्थांनी भारतीय बाजारात नफा कमविण्यासाठी विक्री करण्याने होत आहे.
बाजारात असे अनुत्साहाचे वातावरण असतानाच जाहीर झालेली चलनवाढीची आकडेवारी गुंतवणुकदारांना काहीसा दिलासा देणारी आहे. घाऊक किंमत निर्देेशांकावर आधारित असलेला चलनवाढीचा दर सप्टेंबर महिन्यात कमी होऊन २.३८ टक्के एवढा झाला आहे. आॅक्टोबर २00९ नंतर प्रथमच हा दर एवढा कमी झाला आहे. ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर सप्टेंबर महिन्यात ६.४६ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. अन्न धान्याच्या किंमतीत झालेली घट आणि औद्योगिक वस्तूंची कमी झालेली मागणी यामुळे हा दर घसरल्याचे सांगण्यात येते. चलनवाढ कमी झाल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेवरील ओझे काहीसे कमी झाले आहे.
आगामी सप्ताहात महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या भाजपाला अनुकूल निकालांचा परिणाम बाजारावर होऊ शकतो. या निकालांमुळे बाजार तेजी दाखवू शकेल.
परकीय वित्तसंस्थांनी केली ३९२४ कोटींची विक्री
मुंबई शेअर बाजारात गत सप्ताहात मंदीचेच वातावरण दिसून आले. बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकात तीन दिवस घट झालेली दिसून आली
By admin | Updated: October 21, 2014 04:57 IST2014-10-21T04:57:49+5:302014-10-21T04:57:49+5:30
मुंबई शेअर बाजारात गत सप्ताहात मंदीचेच वातावरण दिसून आले. बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकात तीन दिवस घट झालेली दिसून आली
