Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘सेल’ करणार मालामाल!

‘सेल’ करणार मालामाल!

सरकारच्या निर्गुंतवणूक कार्यक्रम मोठ्या प्रतिसादात आज सुरू झाला. पोलाद क्षेत्रातील प्रमुख कंपनी सेलमधील सरकारच्या ५ टक्के हिस्सा विक्रीला दुपटीहून अधिक प्रतिसाद मिळाला.

By admin | Updated: December 6, 2014 01:54 IST2014-12-06T01:54:07+5:302014-12-06T01:54:07+5:30

सरकारच्या निर्गुंतवणूक कार्यक्रम मोठ्या प्रतिसादात आज सुरू झाला. पोलाद क्षेत्रातील प्रमुख कंपनी सेलमधील सरकारच्या ५ टक्के हिस्सा विक्रीला दुपटीहून अधिक प्रतिसाद मिळाला.

'Sale' is worthless! | ‘सेल’ करणार मालामाल!

‘सेल’ करणार मालामाल!

नवी दिल्ली : सरकारच्या निर्गुंतवणूक कार्यक्रम मोठ्या प्रतिसादात आज सुरू झाला. पोलाद क्षेत्रातील प्रमुख कंपनी सेलमधील सरकारच्या ५ टक्के हिस्सा विक्रीला दुपटीहून अधिक प्रतिसाद मिळाला. या हिस्सा विक्रीतून सरकारला १,७०० कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.
नियोजित कार्यक्रमानुससार, सेलच्या २०.६५ कोटी शेअर्स विकणार आहे. तथापि, आज पहिल्याच दिवशी ४१ कोटींहून अधिकच्या शेअर्ससाठी मागणी प्राप्त झाली. यांची एकत्रित किंमत ३,००० कोटी रुपयांचा निधी प्राप्त होऊ शकेल. दुसरीकडे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव हिस्सासाठीही खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. या श्रेणीत २.६ पट अधिक प्रतिसाद मिळाला.
किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर्ससाठी निश्चित मूल्यावर पाच टक्के सूट देण्यात आली आहे. असे असतानाही एकूण शेअर्सपैकी १० टक्के म्हणजेच सुमारे दोन कोटी शेअर्स त्यांच्यासाठी राखीव आहेत.
सेलच्या शेअर्ससाठी किमान मुल्य ८३ रुपये प्रति शेअर एवढे निश्चित करण्यात आले होते. गुरुवारी बंद झालेल्या भावापेक्षा हे मूल्य २.७५ टक्के कमी आहे. एकूणच ४१.८४ कोटी शेअर्ससाठी बोली लावण्यात आली.
बीएसई व एनएसईच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, सादर करण्यात आलेल्या शेअर्सला दुपारी ३:२५ वाजेपर्यंत २.०३ पट अधिक प्रतिसाद मिळाला होता.

Web Title: 'Sale' is worthless!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.