Lokmat Money > बिझनेस न्यूज > सातबारा कोरा करून जमिनीची विक्री निबंधक, तलाठी, सर्कल विरुद्ध तक्रार : जमीनमालकही गोत्यात

सातबारा कोरा करून जमिनीची विक्री निबंधक, तलाठी, सर्कल विरुद्ध तक्रार : जमीनमालकही गोत्यात

नाशिक : एकदा जमिनीचे साठेखत व नोंदणीकृत खरेदीखत होऊन सातबारा उतार्‍यावर त्याची नोंद झालेली असताना सातबारा कोरा करून तलाठी व मंडळ अधिकार्‍यांनी जमीन मालकाशी संगनमत करून परस्पर तिची विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे ज्या जमिनीच्या खरेदीखताचा व्यवहार दुय्यम निबंधक कार्यालयात यापूर्वीच नोंदविला गेला त्या कार्यालयाने पुन्हा एकवार त्याच जमिनीच्या विक्रीची नोंद करून आपल्या गलथानपणाचे प्रदर्शन घडवून दुष्कृत्यात सहभागी झाले आहे. यासंदर्भात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबरोबरच, जमिनीची पुनर्खरेदी करणार्‍यांविरुद्धही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

By admin | Updated: August 21, 2014 21:45 IST2014-08-21T21:45:35+5:302014-08-21T21:45:35+5:30

नाशिक : एकदा जमिनीचे साठेखत व नोंदणीकृत खरेदीखत होऊन सातबारा उतार्‍यावर त्याची नोंद झालेली असताना सातबारा कोरा करून तलाठी व मंडळ अधिकार्‍यांनी जमीन मालकाशी संगनमत करून परस्पर तिची विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे ज्या जमिनीच्या खरेदीखताचा व्यवहार दुय्यम निबंधक कार्यालयात यापूर्वीच नोंदविला गेला त्या कार्यालयाने पुन्हा एकवार त्याच जमिनीच्या विक्रीची नोंद करून आपल्या गलथानपणाचे प्रदर्शन घडवून दुष्कृत्यात सहभागी झाले आहे. यासंदर्भात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबरोबरच, जमिनीची पुनर्खरेदी करणार्‍यांविरुद्धही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

The sale of land by registering the seven-borrower, registrar against Talathi, Circle: Landlord | सातबारा कोरा करून जमिनीची विक्री निबंधक, तलाठी, सर्कल विरुद्ध तक्रार : जमीनमालकही गोत्यात

सातबारा कोरा करून जमिनीची विक्री निबंधक, तलाठी, सर्कल विरुद्ध तक्रार : जमीनमालकही गोत्यात

शिक : एकदा जमिनीचे साठेखत व नोंदणीकृत खरेदीखत होऊन सातबारा उतार्‍यावर त्याची नोंद झालेली असताना सातबारा कोरा करून तलाठी व मंडळ अधिकार्‍यांनी जमीन मालकाशी संगनमत करून परस्पर तिची विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे ज्या जमिनीच्या खरेदीखताचा व्यवहार दुय्यम निबंधक कार्यालयात यापूर्वीच नोंदविला गेला त्या कार्यालयाने पुन्हा एकवार त्याच जमिनीच्या विक्रीची नोंद करून आपल्या गलथानपणाचे प्रदर्शन घडवून दुष्कृत्यात सहभागी झाले आहे. यासंदर्भात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबरोबरच, जमिनीची पुनर्खरेदी करणार्‍यांविरुद्धही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झारवड येथील गट नंबर ७ मधील हा प्रकार दोन दिवसांपूर्वीच उघडकीस आला आहे. सोमा रामा हळकुंडे या नावसाध्यर्म्याचा फायदा घेत लहानू सोमा हळकुंडे यांनी सदरची जागा चुकीच्या पद्धतीने आपल्या नावावर करून घेतल्यानंतर विष्णू फाळके यांना परस्पर विक्री केल्याची बाब सोमा रामा हळकुंडे यांना समजताच त्यांनी उपविभागीय अधिकार्‍यांकडे धाव घेतली होती. त्यावर सुनावणी होऊन सदरची जागा सोमा रामा हळकुंडे यांची असल्याचा निकाल देण्यात आला. त्यानंतर सोमा हळकुंडे यांनी सदरची जागा ६० लाख रुपयांना सुरेश पांडुरंग नागरे यांना साठेखत व नोंदणीकृत खरेदीखताने विक्री केली. दरम्यान, या जागेचा वाद इगतपुरी न्यायालयात व अपर आयुक्तांपर्यंत पोहोचल्याने जमिनीच्या खरेदी-विक्रीबाबत जैसे थे ठेवण्याचा आदेश दोन्ही न्यायाधिकरणाने दिला होता. त्यानुसार सुरेश नागरे यांचे नाव सातबारा उतार्‍यावर इतर हक्कात लागून तशी नोंदही नमुना ६ ड मध्येही तत्कालीन तलाठी व मंडळ अधिकार्‍याने घेतली. परंतु वर्ष उलटत नाही तोच, तलाठी, मंडळ अधिकार्‍यांनी जमीन मालकाशी संगनमत करून, सातबारा उतार्‍यावरील सर्व नोंदी रद्द करून एकदा विक्री झालेल्या जमिनीची पुन्हा विक्री केली. विशेष म्हणजे सोमा हळकुंडे व सुरेश नागरे यांच्यात झालेल्या नोंदणीकृत खरेदी व्यवहारात या पुढे जैसे थे ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिलेला असताना, तो झुगारून सोमा हळकुंडे यांनी गणेश आडके, लोकेश नागरे, जगदीश राठी व तुकाराम पेखळे यांना विक्री केली. या सार्‍या व्यवहारात झारवडचे तलाठी व मंडल अधिकार्‍यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, तर त्यांना त्र्यंबकच्या दुय्यम निबंधकांनी मदत करून नवीन व्यवहाराची नोंदही करून दिली. या सार्‍या प्रकाराविषयी पोलिसांत फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Web Title: The sale of land by registering the seven-borrower, registrar against Talathi, Circle: Landlord

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.