Lokmat Money > बिझनेस न्यूज > उठसूट बंदमुळे रौप्यनगरीची सामाजिक बांधीलकी धोक्यात मूठभर हुल्लडबाज तरुण; पोलिसांची निष्क्रियता कारणीभूत

उठसूट बंदमुळे रौप्यनगरीची सामाजिक बांधीलकी धोक्यात मूठभर हुल्लडबाज तरुण; पोलिसांची निष्क्रियता कारणीभूत

हुपरी (तानाजी घोरपडे) : सामाजिक व राजकीय चळवळीतील कार्यकर्त्यांनी विसरलेले सामाजिक बांधीलकीचे भान, लोप पावत चाललेल्या सामाजिक जाणीवा तसेच हुपरी पोलिसांची निष्क्रियता व कर्तव्याचा त्यांना पडलेला विसर यामुळे शहरामध्ये वारंवार बंदच्या घटना हुल्लडबाज तरुणांकडून घडवून आणल्या जात आहेत. परिणामी, शहरातील व्यवसाय बंद राहिल्याने व्यवसाय व एस.टी. बस बंद राहात असल्याने प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार अक्षरश: वैतागून गेला आहे. शहरामध्ये विविध कारणांनी वेळोवेळी पुकारण्यात येणारा बंद कायमस्वरुपी थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस खाते, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व जाणकारांनी एकत्रित येण्याची गरज आहे.

By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST2014-11-21T22:38:19+5:302014-11-21T22:38:19+5:30

हुपरी (तानाजी घोरपडे) : सामाजिक व राजकीय चळवळीतील कार्यकर्त्यांनी विसरलेले सामाजिक बांधीलकीचे भान, लोप पावत चाललेल्या सामाजिक जाणीवा तसेच हुपरी पोलिसांची निष्क्रियता व कर्तव्याचा त्यांना पडलेला विसर यामुळे शहरामध्ये वारंवार बंदच्या घटना हुल्लडबाज तरुणांकडून घडवून आणल्या जात आहेत. परिणामी, शहरातील व्यवसाय बंद राहिल्याने व्यवसाय व एस.टी. बस बंद राहात असल्याने प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार अक्षरश: वैतागून गेला आहे. शहरामध्ये विविध कारणांनी वेळोवेळी पुकारण्यात येणारा बंद कायमस्वरुपी थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस खाते, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व जाणकारांनी एकत्रित येण्याची गरज आहे.

Rust-locked youth; Young people; Causes inaction of police | उठसूट बंदमुळे रौप्यनगरीची सामाजिक बांधीलकी धोक्यात मूठभर हुल्लडबाज तरुण; पोलिसांची निष्क्रियता कारणीभूत

उठसूट बंदमुळे रौप्यनगरीची सामाजिक बांधीलकी धोक्यात मूठभर हुल्लडबाज तरुण; पोलिसांची निष्क्रियता कारणीभूत

परी (तानाजी घोरपडे) : सामाजिक व राजकीय चळवळीतील कार्यकर्त्यांनी विसरलेले सामाजिक बांधीलकीचे भान, लोप पावत चाललेल्या सामाजिक जाणीवा तसेच हुपरी पोलिसांची निष्क्रियता व कर्तव्याचा त्यांना पडलेला विसर यामुळे शहरामध्ये वारंवार बंदच्या घटना हुल्लडबाज तरुणांकडून घडवून आणल्या जात आहेत. परिणामी, शहरातील व्यवसाय बंद राहिल्याने व्यवसाय व एस.टी. बस बंद राहात असल्याने प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार अक्षरश: वैतागून गेला आहे. शहरामध्ये विविध कारणांनी वेळोवेळी पुकारण्यात येणारा बंद कायमस्वरुपी थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस खाते, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व जाणकारांनी एकत्रित येण्याची गरज आहे.
देशात कोठेही अप्रिय घटना घडली की त्याची खातरजमा करून न घेता विविध पक्ष, संघटना यांच्याकडून शहरामध्ये निषेधाच्या नावाखाली वेळोवेळी बंद पुकारण्यात येतो. बंद काळात पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून सनदशीर मार्गाने आपल्या भावना व्यक्त करणे गरजेचे असताना अतिउत्साही हुल्लडबाज तरुणांकडून अश्लील भाषेत लाखोली वाहणे, वाहनधारकांना मानसिक त्रास देणे, एस.टी. बसेसवर दगडफेक करून आर्थिक मालमत्तेचे नुकसान करणे, अशा घटना घडवून आणल्या जातात. यातून वादविवादाचे प्रसंग घडले आहेत. एखाद्या अप्रिय घटनेचा निषेध करण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतानाही शहर बंद ठेवून आपल्या संघटनेची किती दहशत आहे, हे दाखविण्यासाठी चुकीच्या पद्धतीचा अतिरेक होऊ लागला आहे. या बंदमुळे व्यापारी, नागरिक, विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक यांना कशा प्रकारच्या मानसिक, शारीरिक व आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते, याची जाणीव या बंद समर्थकांना नाही, हेच यातून दिसते.
शहरात बंद पुकारून आपली ताकद व दहशत किती आहे, याचे मूल्यमापन करण्याची जणू फॅशनच होऊन बसल्याचे चित्र आहे. सामाजिक व राजकीय चळवळीतील कार्यकर्त्यांनी विसरलेले सामाजिक बांधीलकीचे भान, त्यांच्यातील लोप पावत चाललेल्या सामाजिक जाणीवा तसेच हुपरी पोलिसांची त्यांच्या कर्तृत्वाने खालावलेली प्रतिमा, निष्क्रियता, त्यांना पडलेला आपल्या कर्तव्याचा विसर, समाजापेक्षा आपण कोणीतरी वेगळे आहोत, अशी त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली चुकीची समजूत, अशा अनेक कारणांमुळे हुल्लडबाजांवर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. परिणामी, ज्येष्ठांची आदरयुक्त भीती, पोलिसांची व कायद्याचा वचक त्यांच्यासमोर निष्प्रभ ठरत आहे. शहरामध्ये वारंवार पुकारण्यात येणार्‍या बंदला पोलीस खाते, सामाजिक व राजकीय चळवळीतील ज्येष्ठ व जाणकारांनी अतिशय कडक व शिस्तप्रिय अशी भूमिका घेऊन रौप्यनगरीची परंपरा जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अन्यथा शहरातील सामाजिक, व्यावसायिक, संस्कृती लोप पावून सामाजिक जाणिवा नसलेले एक रूक्ष शहर अशी प्रतिमा या रौप्यनगरीची झाल्याचे चित्र आपल्याला पहावयास मिळाल्याशिवाय राहणार नाही.
--------------
चौकट :
पोलीस उपअधीक्षक चैतन्या एस. यांच्याशी संपर्क साधून याप्रश्नी पोलीस प्रशासनाकडून काही ठोस उपाययोजना केली जाणार आहे काय? यासाठी प्रयत्न केले असता ते आता दौर्‍यासाठी गेल्याचे त्यांच्या पी.ए.नी सांगितले. भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Rust-locked youth; Young people; Causes inaction of police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.