Lokmat Money > बिझनेस न्यूज > रुपया स्थिरावणार ७० वर

रुपया स्थिरावणार ७० वर

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत सलग पाचव्या वर्षी घसरण नोंदवीत ६७ रुपयांची पातळी गाठणाऱ्या भारतीय रुपयाचा प्रवास आगामी वर्षात ७० च्या दिशेन होईल व आगामी किमान

By admin | Updated: December 25, 2015 01:27 IST2015-12-25T01:27:13+5:302015-12-25T01:27:13+5:30

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत सलग पाचव्या वर्षी घसरण नोंदवीत ६७ रुपयांची पातळी गाठणाऱ्या भारतीय रुपयाचा प्रवास आगामी वर्षात ७० च्या दिशेन होईल व आगामी किमान

Rupee stabilizes at 70 | रुपया स्थिरावणार ७० वर

रुपया स्थिरावणार ७० वर

मुंबई : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत सलग पाचव्या वर्षी घसरण नोंदवीत ६७ रुपयांची पातळी गाठणाऱ्या भारतीय रुपयाचा प्रवास आगामी वर्षात ७० च्या दिशेन होईल व आगामी किमान दोन वर्षे डॉलरच्या तुलनेत रुपया आता ६५ ते ७० च्या पातळीवर स्थिरावेल, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. रुपयामध्ये होणाऱ्या घसरणीचा मोठा फटका महागाई भडकण्याच्या रूपाने दिसून येईल.
अमेरिकी फेडरलने व्याजदरात केलेली वाढ, चीनमधील मंदी आणि एकूण आंतरराष्ट्रीय अर्थकारणातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जगातील सशक्त चलन मानल्या जाणाऱ्या अमेरिकी डॉलरच्या तुलनेत अनेक देशांच्या चलनांमध्ये लक्षणीय घसरण झाली आहे व होत आहे. भारतीय रुपयाही याला अपवाद नाही. पाच वर्षांपूर्वी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ४२ ते ४५ पातळीवर असलेला रुपया आता ६७ च्या पातळीवर पोहोचला आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, नजीकच्या काळात या परिस्थितीत फारसा फरक होण्याची चिन्हे नाहीत. परिणामी, २०१६ च्या वर्षात रुपया प्रति अमेरिकी डॉलर ७० ची पातळी गाठताना दिसेल.
रुपयामध्ये होणाऱ्या या घसरणीचा थेट फटका महागाई भडकण्याच्या रूपाने दिसून येईल. रुपया आणि डॉलरच्या दरातील संबंधांबाबत अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, डॉलरच्या तुलनेत एक रुपयाने जरी रुपया घसरला तरी किमान १२ हजार कोटी रुपयांनी आयातीचा खर्च वाढतो. हा हिशोब लक्षात घेता जर रुपया ७० वर पोहोचला, तर आयातीच्या खर्चात लक्षणीय वाढ होईल. (प्रतिनिधी)
एकीकडे कच्च्या तेलाच्या बाजारात सातत्याने घसरण होताना दिसत असली तरी, त्याचा फारसा फायदा ग्राहकांना होताना दिसत नाही, यामागेही सातत्याने घसरणारा रुपया हेच कारण असल्याचे विश्लेषण अर्थतज्ज्ञ करतात. केवळ कच्चे तेलच नव्हे, तर खाद्यतेल आणि सुमारे १४३ जीवनावश्यक घटक भारत आयात करतो.

Web Title: Rupee stabilizes at 70

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.