मुंबई : बँक आणि आयातदारांकडून सातत्याने डॉलरची मागणी होत असल्याने आणि शेअर बाजारातील घसरणीमुळे विदेशी भांडवल काढून घेतले जात असल्याने आंतर बँक चलनविनिमय बाजारात रुपया डॉलरच्या तुलनेत ३६ पैशांनी घसरला. दोन वर्षातील नीचांक गाठत रुपया प्रति डॉलरवर ६६.८२ वर आला. यापूर्वी ४ सप्टेंबर २०१३ रोजी रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत ६७.०७ रुपये होते. गेल्या तीन दिवसांत रुपयाचे मूल्य ६३ पैशांनी घसरले आहे. शेअर बाजारातील घसरणीमुळे विदेशात डॉलर मजबूत झाल्याने रुपयांत घसरण झाली.
भारतीय रिझर्व्ह बँकेने सोमवारी संदर्भ दर प्रति डॉलर ६६.७४ रुपये आणि प्रति युरो ७४.२७ रुपये निश्चित केला होता. पौंड, युरो आणि येनच्या तुलनेतही रुपया घसरला.
डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला
बँक आणि आयातदारांकडून सातत्याने डॉलरची मागणी होत असल्याने आणि शेअर बाजारातील घसरणीमुळे विदेशी भांडवल काढून घेतले जात असल्याने आंतर बँक चलनविनिमय
By admin | Updated: September 8, 2015 04:17 IST2015-09-08T04:17:52+5:302015-09-08T04:17:52+5:30
बँक आणि आयातदारांकडून सातत्याने डॉलरची मागणी होत असल्याने आणि शेअर बाजारातील घसरणीमुळे विदेशी भांडवल काढून घेतले जात असल्याने आंतर बँक चलनविनिमय
