मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण शुक्रवारीही सुरूच राहिली. आंतरबँकिंग विदेशी विनिमय बाजारात रुपया १0 पैशांनी घसरला. त्याबरोबर एका डॉलरची किंमत ६0.२८ रुपये झाली. आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढल्यामुळे रुपयात घसरण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
फोरेक्स डीलरनी सांगितले की, स्थानिक शेअर बाजारात भांडवलाचा ओघ वाढल्यामुळे रुपयाच्या घसरणीला ब्रेक लागला. सकाळी फोरेक्स बाजारात रुपया ६0.४१ प्रति डॉलर अशा कमजोर स्थितीत उघडला होता. नंतर तो ६0.४६ च्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. कालच्या व्यवसायात रुपया ६0.१८ प्रति डॉलरच्या पातळीवर बंद झाला होता.
निर्यातदारांकडून डॉलरच्या विक्रीचा जोर वाढला. त्याचा सुयोग्य परिणाम होऊन रुपया हळूहळू वर चढू लागला. शेवटी १0 पैशांच्या म्हणजेच 0.१७ टक्क्यांच्या घसरणीसह रुपया ६0.२८ प्रति डॉलर या दरावर बंद झाला. (प्रतिनिधी)
डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला
डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण शुक्रवारीही सुरूच राहिली.
By admin | Updated: July 19, 2014 00:11 IST2014-07-18T23:25:30+5:302014-07-19T00:11:08+5:30
डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण शुक्रवारीही सुरूच राहिली.
