मुंबई : शेअर बाजारातील मंदीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी भारतीय रुपया गेल्या तीन आठवड्यांत डॉलरमागे ४० पैशांनी वधारला. काही बँका आणि निर्यातदारांनी नव्याने डॉलर विकायला काढल्यामुळे हा लाभ झाला. शिवाय विदेशींनी देशातील कर्ज विकत घेण्याची चर्चा होत असल्याचाही फायदा रुपया वधारण्यात झाला. मंगळवारी डॉलरमागे ६३.५७ रुपयांवर बंद झाला होता तो ६३.५१ सुरू झाला.
नंतर तो काही शेअर्स कमकुवत होऊन डॉलर मजबूत होताच तो ६३.५६ एवढा खाली आला. त्यानंतर रुपया डॉलरची निर्यातदारांकडून व काही बँकांनी नव्याने विक्री सुरू होताच ४० पैशांनी वधारून तो ६३.१५ रुपयांवर आला. १८ डिसेंबरनंतर रुपयाला मिळालेली ही मोठी वाढ आहे. त्या दिवशी त्याला ५० पैशांचा लाभ झाला होता.
गेल्या दोन सत्रांत रुपया २८ पैसे किंवा ०.४४ टक्क्यांनी खाली आला होता. सेन्सेक्स मंगळवारी ८५५ अंकांनी (३.०७ टक्के) कोसळला होता, तोच कल दुसऱ्या दिवशीही राहिला. परकीयांनी बुधवारी एक हजार कोटी रुपयांचे शेअर्स विकले. त्याचा योग्य परिणाम रुपयावर झाला.