Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘एनआरएचएम’मधून राज्याला 1003 कोटी मंजूर सोलापूरला 27़45 कोटी ; दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर केंद्र शासन पावले

‘एनआरएचएम’मधून राज्याला 1003 कोटी मंजूर सोलापूरला 27़45 कोटी ; दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर केंद्र शासन पावले

सोलापूर- शिवाजी सुरवसे

By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST2014-11-21T22:38:14+5:302014-11-21T22:38:14+5:30

सोलापूर- शिवाजी सुरवसे

Rs. 2745 crore to Solapur, approved by NRHM for 1003 crore; After ten months of waiting, the Central Government took steps | ‘एनआरएचएम’मधून राज्याला 1003 कोटी मंजूर सोलापूरला 27़45 कोटी ; दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर केंद्र शासन पावले

‘एनआरएचएम’मधून राज्याला 1003 कोटी मंजूर सोलापूरला 27़45 कोटी ; दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर केंद्र शासन पावले

लापूर- शिवाजी सुरवसे
केंद्रातील मोदी सरकारने दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आरोग्य खात्याच्या महत्त्वाकांक्षी समजल्या जाणार्‍या एनआरएचएम (राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान) चा 2014-15 या वर्षांचा प्रकल्प अंमलबजावणी आराखडा (पीआयपी) मंजूर केला आह़े थेट 100 टक्के अनुदान असलेल्या या योजनेतून राज्यातील 33 जिल्?ांसाठी 1003 कोटी 84 लाख रुपये मंजूर झाले आहेत़
15 नोव्हेंबर रोजी कुटुंब कल्याण आयुक्तांनी त्या त्या जिल्?ाचा प्रकल्प अंमलबजावणी आराखडा मंजूर केला आह़े त्यामुळे येत्या 10 ते 15 दिवसांत हा निधी त्या त्या जिल्हा परिषदांना वितरीत होणार आह़े आता मार्चअखेर हा निधी खर्च करण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आह़े नियमित लसीकरण, कुटुंब कल्याण आणि आरोग्य अभियान या तीनही योजनेत केंद्राकडून राज्याला 1003 कोटी मंजूर झाले आहेत़ नियमित लसीकरणासाठी 35 कोटी, कुटुंब कल्याणसाठी (आरसीएच) 680 कोटी तर एनआरएचएम या हेडवर 288 कोटी असे एकत्रित 1003 कोटी मंजूर करण्यात आले आहेत़
दहा महिन्यांपासून या योजनेतील निधी देण्यासाठी केंद्राने हात आखडता घेतला होता़ एनआरएचएम योजना यापूर्वी केवळ ग्रामीण भागासाठी लागू होती़ आता शहरासाठीदेखील ही योजना लागू केली असल्यामुळे तिचे नामांतर आता एनआरएचएम ऐवजी ‘एनएचएम’ (नॅशनल हेल्थ मिशन) करण्यात आले आह़े या योजनेंतर्गतजननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, आरसीएच, नियमित लसीकरण, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, रुग्ण कल्याण समिती योजना आदी कार्यक्रम राबविले जातात़ खूप मोठय़ा प्रमाणात जिल्?ाला या योजनेतून निधी मिळतो, त्यामुळे जिल्हा परिषदांना या योजनांचा मोठा ‘आधार’ आह़े
दहा महिन्यांपासून निधी नसल्यामुळे अनेक कंत्राटी सेवकांचा पगार, विविध योजना तसेच वाहनांची बिलेदेखील प्रलंबित राहिली होती़ आता निधी मंजूर झाल्यामुळे तो लवकर प्राप्त होईल आणि सर्व यंत्रणा पूर्ववत होईल, अशी माहिती सोलापूर जिल्हा आरोग्याधिकारी डॉ़ सुनील भडकुंबे यांनी दिली़



इन्फो बॉस़़
जिल्हानिहाय मंजूर झालेला निधी
-ठाणे- 45़93 कोटी
-रायगड-21़34 कोटी
-रत्नागिरी-19़99 कोटी
-नाशिक-41़46 कोटी
-धुळे-18़97 कोटी
-नंदूरबार-26़98 कोटी
-जळगाव-31़84 कोटी
-अहमदनगर-32़25 कोटी
-पुणे-37़98 कोटी
-सोलापूर-27़45 कोटी
-कोल्हापूर-25़25 कोटी
-सांगली-24़39 कोटी
-सातारा-20़93 कोटी
-सिंधूदुर्ग-15़19 कोटी
-औरंगाबाद- 23़59 कोटी
-जालना-18़40 कोटी
-परभणी-16़13 कोटी
-हिंगोली-15़26 कोटी
-लातूर- 20़17 कोटी
-उस्मानाबाद-16़24 कोटी
-बीड-30़32 कोटी
-नांदेड-35़27 कोटी
-अकोला-17़21 कोटी
-अमरावती-34़82 कोटी
-बुलढाणा-24़45 कोटी
-वाशिम-12़82 कोटी
-यवतमाळ-31़73 कोटी
-नागपूर-27़11 कोटी
-वर्धा-15़95 कोटी
-भंडारा-15़42 कोटी
-गोंदीया-24़49 कोटी
-चंद्रपूर-23़27 कोटी
-गडचिरोली-26़66 कोटी

Web Title: Rs. 2745 crore to Solapur, approved by NRHM for 1003 crore; After ten months of waiting, the Central Government took steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.