Lokmat Money > बिझनेस न्यूज > सुवर्ण रोख्यांच्या माध्यमातून १५ हजार कोटी उभारणार

सुवर्ण रोख्यांच्या माध्यमातून १५ हजार कोटी उभारणार

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत १५ हजार कोटी रुपये किमतीचे सुवर्ण रोखे आणण्याची सरकारची योजना आहे. या योजनेचा उद्देश

By admin | Updated: July 26, 2015 22:50 IST2015-07-26T22:50:36+5:302015-07-26T22:50:36+5:30

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत १५ हजार कोटी रुपये किमतीचे सुवर्ण रोखे आणण्याची सरकारची योजना आहे. या योजनेचा उद्देश

Rs 15,000 crore will be raised through gold bars | सुवर्ण रोख्यांच्या माध्यमातून १५ हजार कोटी उभारणार

सुवर्ण रोख्यांच्या माध्यमातून १५ हजार कोटी उभारणार

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत १५ हजार कोटी रुपये किमतीचे सुवर्ण रोखे आणण्याची सरकारची योजना आहे. या योजनेचा उद्देश हा सोन्याच्या मागणीला अटकाव करण्याचा आणि या रोख्यांच्या माध्यमातून पैसा उभा करण्याचा आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या सुवर्ण रोख्यांच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून ते महिनाभरात बाजारात उपलब्ध होतील. हे रोखे टपाल कार्यालये व दलालांच्या माध्यमातून कमीशनच्या आधारावर विकले जातील.
सरकारची या आर्थिक वर्षात ६ लाख कोटी रुपयांचे कर्ज उभारण्याची योजना आहे. यातील ३.६ लाख कोटी रुपयांचे कर्ज सप्टेंबर २०१५ पर्यंत व उर्वरीत आॅक्टोबर-मार्च या सहामाहीत घेतले जाईल.

Web Title: Rs 15,000 crore will be raised through gold bars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.