अहमदनगर: उद्योग उभारणीसाठी औद्योगिक विकास महामंडळाकडून नियोजन करण्यात येत असून, औद्योगिक विकासात महामंडळाची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरविंद पारगावकर यांनी शुक्रवारी येथे केले
औद्योगिक विकास महामंडळाच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे उदघाटन पारगावकर यांच्या हस्ते करण्यात आले़ त्यावेळी ते बोलत होते़ लेफ्टनंट कर्नल शैलेंद्र सिंग,आमी संघटनेचे अध्यक्ष अशोक सोनवणे, नवनागापूर ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ता सप्रे,निवृत्त उपअभियंता सुभाष घिगे, उपभियंता खांदे आणि उपअभियंता रमेश गुंड यावेळी उपस्थित होते़
पारगावकर म्हणाले, औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने वसाहतींचे नियोजन करण्यात येत आहे़ त्यामुळे शहरांच्या औद्योगिक विकासात भर पडत असून, मोठे उद्योग आल्यास शहरांचा विकास शक्य आहे़त्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले़ नगर शहराच्या बाजूच्या शहरांचा झपाट्याने विकास होत आहे़तुलनेत नगर शहराचा विकास झाला नाही़ या शहराचा औद्योगिक विकास होणे गरजेचे असल्याची अपेक्षा शैलेंद्र सिंग यांनी व्यक्त केली़ महामंडळाच्या वतीने आयोजित स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना यावेळी पारितोषिकांचे वितरण करण्यात आले़
़़़
महामंडळ स्थापनेला ५२ वर्षे पूर्ण
औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना १ ऑगस्ट १९६२ रोजी करण्यात आली आहे़ महामंडळाने विविध पार्कची निर्मिती केली असून, विविध प्रकारचे २४२ क्षेत्र विकसित केली आहेत़ महामंडळाने उद्योगासाठी ६२ हजार हेक्टर जमीन ताब्यात घेतली आहे़ या क्षेत्रावर उद्योग उभारण्यात आले आहे़
औद्योगिक विकासात महामंडळाची भूमिका महत्वाची वर्धापन दिन साजरा: अध्यक्ष पारगावकर यांचे प्रतिपादन
अहमदनगर: उद्योग उभारणीसाठी औद्योगिक विकास महामंडळाकडून नियोजन करण्यात येत असून, औद्योगिक विकासात महामंडळाची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरविंद पारगावकर यांनी शुक्रवारी येथे केले
By admin | Updated: August 3, 2014 00:49 IST2014-08-01T22:30:52+5:302014-08-03T00:49:08+5:30