नवी दिल्ली : जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत गुरुवारी सोन्याचा भाव २० रुपयांनी कमी होऊन २६,७८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांच्या मागणीत घट झाल्याने चांदीचा भावही १०० रुपयांच्या घसरणीसह ३६,२०० रुपये प्रतिकिलोवर राहिला.
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे; मात्र यामुळे बाजारधारणेला तेजी मिळू शकली नाही. ज्वेलर्स, रिटेलर्स यांची मागणी घटल्याने बाजारावर परिणाम झाला. डॉलर मजबूत झाल्याने जागतिक बाजारातही घसरणीचा कल होता. देशी बाजार कल निर्धारित करणाऱ्या सिंगापुरात सोन्याचा भाव कमी होऊन १,१८१.५५ डॉलर प्रतिऔंस झाला.दिल्लीत ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी २० रुपयांनी घटून अनुक्रमे २६,७८० रुपये आणि २६,५८० रुपये प्रति १० ग्रॅम राहिला. तथापि, आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २३,८०० रुपयांवर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोने-चांदीच्या भावात किरकोळ घसरण
जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत गुरुवारी सोन्याचा भाव २० रुपयांनी कमी होऊन २६,७८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला
By admin | Updated: November 21, 2014 03:37 IST2014-11-21T03:37:24+5:302014-11-21T03:37:24+5:30
जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत गुरुवारी सोन्याचा भाव २० रुपयांनी कमी होऊन २६,७८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला
