मंबई : मुंबई महानगरपालिका वगळून राज्यातील नगरपालिका व महानगरपालिकांमार्फत चालविण्यात येणार्या माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी देण्यास शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे दहा हजार शिक्षकांना मिळणार आहे.अनुदानित अशासकीय शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शालेय शिक्षण विभागाने सुधारित वेतनश्रेणी लागू केली आहेत. याच धर्तीवर राज्यातील नगरपरिषदा व महानगरपालिकांच्या शाळांमधील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक ७ हजार ४३३ आणि २ हजार ६९२ शिक्षकेतर कर्मचार्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शिक्षण विभागाने सोमवारी अध्यादेशाद्वारे मान्यता दिली आहे. (प्रतिनिधी)
महापालिका, नगरपालिका शाळांतील शिक्षकांना सुधारित वेतनश्रेणी
मुंबई : मुंबई महानगरपालिका वगळून राज्यातील नगरपालिका व महानगरपालिकांमार्फत चालविण्यात येणार्या माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी देण्यास शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे दहा हजार शिक्षकांना मिळणार आहे.
By admin | Updated: June 16, 2014 23:12 IST2014-06-16T23:12:44+5:302014-06-16T23:12:44+5:30