Lokmat Money > बिझनेस न्यूज > आडत समितीचा अहवाल पुन्हा पडला लांबणीवर

आडत समितीचा अहवाल पुन्हा पडला लांबणीवर

बाजार समित्यांतील आडत व तोलाई कोणाकडून वसूल करायची यासंदर्भातील निर्णयासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा अहवाल शासनाने ३१ आॅगस्टपर्यंत मागविला होता.

By admin | Updated: September 2, 2015 00:08 IST2015-09-01T22:35:33+5:302015-09-02T00:08:23+5:30

बाजार समित्यांतील आडत व तोलाई कोणाकडून वसूल करायची यासंदर्भातील निर्णयासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा अहवाल शासनाने ३१ आॅगस्टपर्यंत मागविला होता.

The report of the closed committee was postponed for a long time | आडत समितीचा अहवाल पुन्हा पडला लांबणीवर

आडत समितीचा अहवाल पुन्हा पडला लांबणीवर

पुणे : बाजार समित्यांतील आडत व तोलाई कोणाकडून वसूल करायची यासंदर्भातील निर्णयासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा अहवाल शासनाने ३१ आॅगस्टपर्यंत मागविला होता. मात्र, हा अहवाल अद्यापही सादर झालेला नसून त्यास आणखी विलंब लागणार आहे.
राज्यात बाजार समित्यांमध्ये शेतमाल विक्री करताना शेतकऱ्यांकडून आडत घेतली जाते. ही आडत बंद करण्याचा निर्णय झाला होता; परंतु या निर्णयाला व्यापाऱ्यांकडून विरोध झाल्याने तो स्थगित करण्यात आला.
याप्रश्नी अभ्यास करुन निर्णय घेण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी प्रथम ३१ मेची मुदत देण्यात आली होती. नंतर पुन्हा दोन वेळा ३१ जुलै व ३१ आॅगस्ट अशी मुदत करण्यात आली. मात्र, या मुदतीतही अहवाल सादर झालेला नाही. हा अहवाल सादर करण्यासाठी आणखी किमान पंधरा दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे प्रभारी पणन संचालक किशोर तोष्णीवाल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The report of the closed committee was postponed for a long time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.