नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी आज महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता असून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन मंगळवारी रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची कपात करू शकतात.
चालू आर्थिक वर्षातील चौथी द्वैमासिक आढावा बैठक आज होत आहे. औद्योगिक उत्पादनात आलेली मरगळ, देशभरात बहुतांश भागात मान्सूनने फिरविलेली पाठ, अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ करण्याचा टाळलेला निर्णय या पार्श्वभूमीवर आजच्या निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मतानुसार गव्हर्नर रघुराम राजन यांच्याकडून आज रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची कपात होऊ शकते. हा दर ७ टक्क्यांपर्यंत ते खाली आणू शकतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)
आज रेपो रेटमध्ये कपात होणार?
अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी आज महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता असून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन मंगळवारी रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची कपात करू शकतात.
By admin | Updated: September 28, 2015 23:21 IST2015-09-28T23:21:25+5:302015-09-28T23:21:25+5:30
अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी आज महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता असून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन मंगळवारी रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची कपात करू शकतात.