Lokmat Money > बिझनेस न्यूज > ॲथलेटिक्स प्रशिक्षक विजेंदर सिंग यांची बदली

ॲथलेटिक्स प्रशिक्षक विजेंदर सिंग यांची बदली

नाशिकच्या खेळाडू, क्रीडा संघटनांची बदली रद्द करण्याची मागणी

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:08+5:302014-12-20T22:27:08+5:30

नाशिकच्या खेळाडू, क्रीडा संघटनांची बदली रद्द करण्याची मागणी

Replacement of Athletics coach Vijender Singh | ॲथलेटिक्स प्रशिक्षक विजेंदर सिंग यांची बदली

ॲथलेटिक्स प्रशिक्षक विजेंदर सिंग यांची बदली

शिकच्या खेळाडू, क्रीडा संघटनांची बदली रद्द करण्याची मागणी
नाशिक : सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊत, अंजना ठमके, मोनिका आथरे, संजीवनी जाधव, किसन तडवी असे आंतरराष्ट्रीय धावपटू देशाला देणारे ॲथलेटिक्सचे साई प्रशिक्षक विजेंदर सिंग यांची शासनाने अचानक भोपाळ येथे बदली केली आहे़ यामुळे नाशिकच्या सर्व ॲथलेटिक्स खेळाडूंचे भविष्य अंधकारमय होणार असल्याने सिंग यांची कोणत्याही परिस्थितीत बदली रद्द करण्याची गळ या खेळाडूंनी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना घातली आहे़
विजेंदर सिंग हे १९९१ पासून नाशिक विभागात स्पोर्ट्स ॲथोरीटी ऑफ इंडिया (साई)चे ॲथलेटिक्स प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत़ त्यांना नाशिकच्या आदिवासींचे राहणीमान व अनुवंशिक सवयींमध्ये केनिया व इथोपिया येथील खेळाडूंसारखे साम्य आढळून आल्याने त्यांनी नाशिकच्या आदिवासी भागात खेळातील गुणवत्ता शोध मोहीम राबवून आदिवासी पाड्यातील प्रतिभावंत खेळाडूंना पुढे आणले़ यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाशिकचे आदिवासी खेळाडू चमकत आहेत़ यामध्ये कविता राऊत, मोनिका आथरे, अंजना ठमके, संजीवनी जाधव, किसन तडवी, दत्ता बोरसे या आंतरराष्ट्रीय, तर कांतीलाल कुंभार, गोविंद राय, हिरामण तडवी, ताई बामणे, दुर्गेश महाले, दुर्गा देवरे यांच्यासह २२ राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंना त्यांनी घडवले आहेत़ या खेळाडूंच्या नावावर १६ राज्यस्तरीय, तर ७ राष्ट्रीय उच्चांक आहेत़ महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीच्या, जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व भोसला मिलिटरी स्कूलच्या सहकार्याने त्यांनी खेळाडू दत्तक योजना सुरू केली आहे़ ज्यामध्ये आदिवासी भागातील खेळाडूंना सर्वसुविधा उपलब्ध करू न देऊन त्यांची गुणवत्ता देशाला दाखवून दिली आहे़
खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची भेट घेऊन उपस्थित ८० खेळाडूंनी हुंदके देत विजेंदर सिंग यांची बदली रद्द करून आमचे भविष्य वाचविण्याची विनंती केली आहे़ याबाबत आपण तातडीने क्रीडा मंत्रालयाशी चर्चा करणार असल्याचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी आश्वासन दिले़
चौकट
मिशन ऑलम्पिक अधांतरीच
मिशन ऑलम्पिक योजनेअंतर्गत त्यांनी २०१६ व २०२० मध्ये कोणत्याही परिस्थितीत नाशिकचे ॲथलेटिक्सपटू भारताला पदके मिळवून देणारच हा दावा त्यांनी केला होता़ त्या दृष्टीने तयारी सुरू असतानाच त्यांची बदली झाल्याने नाशिकच्या सर्वच खेळाडूंचे नुकसान होण्याबरोबरच देशाचे ऑलम्पिकचे स्वप्न भंग पावणार आहे़
फोटो क्रमांक- 20पीएचडीसी136
फोटो ओळी : खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना सिंग यांची बदली रद्द करण्याचे निवेदन देताना संघटनेचे अनिल वाघ व खेळाडू़

Web Title: Replacement of Athletics coach Vijender Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.