Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिझर्व्ह बँकेवर दडपण

रिझर्व्ह बँकेवर दडपण

रिझर्व्ह बँक आपले चालू आर्थिक वर्षातील तिसरे द्विवार्षिक आर्थिक धोरण मंगळवारी (४ आॅगस्ट) जाहीर करणार असून त्यात व्याजदर कमी करण्यात यावा

By admin | Updated: August 3, 2015 23:05 IST2015-08-03T23:05:29+5:302015-08-03T23:05:29+5:30

रिझर्व्ह बँक आपले चालू आर्थिक वर्षातील तिसरे द्विवार्षिक आर्थिक धोरण मंगळवारी (४ आॅगस्ट) जाहीर करणार असून त्यात व्याजदर कमी करण्यात यावा

Regression on the Reserve Bank | रिझर्व्ह बँकेवर दडपण

रिझर्व्ह बँकेवर दडपण

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक आपले चालू आर्थिक वर्षातील तिसरे द्विवार्षिक आर्थिक धोरण मंगळवारी (४ आॅगस्ट) जाहीर करणार असून त्यात व्याजदर कमी करण्यात यावा, असे उद्योग व सरकारकडून दडपण आहे. तथापि, काही तज्ज्ञांनी किरकोळ चलनवाढ जास्त असल्यामुळे व्याजदर कमी होणार नाही, असे मत व्यक्त केले आहे.
आर्थिक विकासाला गती मिळण्यासाठी व्याजदरात कपात व्हावी असे सरकारलाही वाटते. व्याजदरात कपातीची मला अपेक्षा नाही, असे स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी म्हटले. आपल्या आर्थिक धोरणासाठी रिझर्व्ह बँक बहुतेक वेळा ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) प्रमाण मानते. घाऊक किंमत निर्देशांक नकारात्मक असला तरी ग्राहक किंमत निर्देशांक काहीसा वर गेलेला आहे व त्यासाठी खाद्यान्नाच्या किमतीतील वाढ कारणीभूत आहे, त्यामुळे व्याजदरात कपात शक्य नाही, असे भट्टाचार्य म्हणाल्या.
मान्सूनच्या प्रगतीवरही रिझर्व्ह बँकेचे बारीक लक्ष आहे. आज तरी मान्सून चांगला की वाईट याचा निर्णय झालेला नाही, त्यामुळे व्याजदराबाबत आहे तीच परिस्थिती कायम राहील, असे बँक आॅफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक रंजन धवन यांनी सांगितले.

Web Title: Regression on the Reserve Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.