मुंबई : औद्योगिक वापरासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळातर्फे (एमआयडीसी) उद्योगांना करण्यात येणा-या पाण्याच्या दरात २५ ते ३० टक्के कपात करण्याचा निर्णय उद्योगमंत्री प्रकाश मेहता यांनी जाहीर केला.
उद्योगमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मेहता यांनी एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अंधेरी कार्यालयात बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आल्याचे महामंडळाने पत्रकाद्वारे कळविले आहे.
विजेचे दर वाढल्याच्या कारणास्तव उद्योगांकरिता देण्यात येणाऱ्या पाण्याच्या शुल्कात दोन वर्षांपूर्वी वाढ करण्यात आली होती. या विरोधात महामंडळाने राज्य वीज नियामक आयोगाकडे दाद मागितली होती.
या संदर्भात झालेल्या सुनावणीत महावितरणनेही स्वस्त दरात वीज देण्याची भूमिका आयोगासमोर घेतली होती. १४ आॅगस्ट रोजी राज्य वीज नियामक आयोगाने या दर कपातीला मान्यता दिली होती. त्या पार्श्वभूमीवर घटलेल्या विजेच्या दराच्या अनुषंगाने पाण्याचे दर कमी करण्याचा निर्णय झाला आहे. (प्रतिनिधी)
एमआयडीसीच्या पाणी शुल्कात कपात
औद्योगिक वापरासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळातर्फे (एमआयडीसी) उद्योगांना करण्यात येणा-या पाण्याच्या दरात २५ ते ३० टक्के कपात करण्याचा निर्णय उद्योगमंत्री प्रकाश मेहता यांनी जाहीर केला
By admin | Updated: November 8, 2014 01:37 IST2014-11-08T01:37:35+5:302014-11-08T01:37:35+5:30
औद्योगिक वापरासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळातर्फे (एमआयडीसी) उद्योगांना करण्यात येणा-या पाण्याच्या दरात २५ ते ३० टक्के कपात करण्याचा निर्णय उद्योगमंत्री प्रकाश मेहता यांनी जाहीर केला
