नवी दिल्ली : सरकारच्या मालकीची कोळसा कंपनी कोल इंडिया पुढील महिन्यात सुमारे ८00 कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. त्यानुसार, पुढील ५ वर्षांत कोल इंडियाचे कोळसा उत्पादन दुप्पट करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ही योजना यशस्वी झाल्यास कंपनीचे उत्पादन १ अब्ज टनावर जाईल. यासाठी कंपनीला अधिक मनुष्यबळाची गरज आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे. नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती मनुष्यबळ विकास, वित्त, विपणन आणि विक्रीसह विभिन्न विभागांत होणार आहे.
‘कोल इंडिया’ करणार भरती
सरकारच्या मालकीची कोळसा कंपनी कोल इंडिया पुढील महिन्यात सुमारे ८00 कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार आहे.
By admin | Updated: January 4, 2015 22:16 IST2015-01-04T22:16:18+5:302015-01-04T22:16:18+5:30
सरकारच्या मालकीची कोळसा कंपनी कोल इंडिया पुढील महिन्यात सुमारे ८00 कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार आहे.
