Lokmat Money > बिझनेस न्यूज > बंद भूविकास बँकेचे सव्वाकोटी वसूल

बंद भूविकास बँकेचे सव्वाकोटी वसूल

संपूर्ण व्यवहार ठप्प झालेल्या भूविकास बँकेचे १७० शेतकऱ्यांनी एक कोटी २२ लाख १२ हजार इतकी रक्कम भरली असून ४९४ शेतकऱ्यांनी ३ कोटी ९८ लाख ७९ हजार रुपये भरल्यास

By admin | Updated: April 8, 2016 03:13 IST2016-04-08T03:13:38+5:302016-04-08T03:13:38+5:30

संपूर्ण व्यवहार ठप्प झालेल्या भूविकास बँकेचे १७० शेतकऱ्यांनी एक कोटी २२ लाख १२ हजार इतकी रक्कम भरली असून ४९४ शेतकऱ्यांनी ३ कोटी ९८ लाख ७९ हजार रुपये भरल्यास

Recovery of bank deposits in closed land development | बंद भूविकास बँकेचे सव्वाकोटी वसूल

बंद भूविकास बँकेचे सव्वाकोटी वसूल

अरुण बारसकर, सोलापूर
संपूर्ण व्यवहार ठप्प झालेल्या भूविकास बँकेचे १७० शेतकऱ्यांनी एक कोटी २२ लाख १२ हजार इतकी रक्कम भरली असून ४९४ शेतकऱ्यांनी ३ कोटी ९८ लाख ७९ हजार रुपये भरल्यास १२ कोटी ८१ लाख ३८ हजार रुपयाची सवलत मिळणार असल्याचे बँकेचे प्रशासक बिभिषण लावंड यांनी सांगितले.
एकेकाळी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी भूविकास बँक एकमेव मदतीला धावून येणारी बँक म्हणून ओळखली जात होती. या बँकेकडून विहिर, पाईपलाईन व शेतीविषक कामासाठी कर्ज वितरित केले जात होते. कालांतराने चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप झाल्याने व पाऊस नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आल्याने थकबाकीची रक्कम वाढत गेली. वरचेवर थकित कर्जाचा आकडा वाढत गेल्याने व शासनाने बँक व शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने बँकेचा कारभार ठप्प झाला. यामुळे शासनाने या बँकेवर प्रशासक नेमला. एकरकमी परतफेड योजना सुरू करुन व्याजही बंद केले. एकरकमी कर्ज परतफेड योजनेची मूदत ३१ मार्चपर्यंत होती. ३१ मार्चपर्यंत जिल्ह्णातील १७० शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. या शेतकऱ्यांनी एक कोटी २२ लाख १२ हजार रुपयेचा भरणा केल्याने त्यांना दोन कोटी ८२ लाख ९८ हजार रुपयाची सवलत मिळाली आहे. उर्वरित ४९४ शेतकऱ्यांकडे आता ३ कोटी ९८ लाख ७९ हजार रुपये इतकी बाकी आहे. आता शासनाने पैसे भरण्यास मुदतवाढ दिल्यास शेतकऱ्यांना १२ कोटी ९ लाख२१ हजार रुपये इतकी सवलत मिळणार आहे.

Web Title: Recovery of bank deposits in closed land development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.