Lokmat Money > बिझनेस न्यूज > राज्यात करमणूक करापोटी ६ महिन्यांत ४५ कोटींची वसुली

राज्यात करमणूक करापोटी ६ महिन्यांत ४५ कोटींची वसुली

चित्रपटगृह, केबल, आॅर्केस्ट्रा, डीटीएच व इतर मनोरंजनाच्या माध्यमातून एप्रिल ते सप्टेंबर २०१४ या सहा महिन्यांच्या कालावधीत राज्यातून तब्बल ४५ कोटींचा करमणूक कर शासनाच्या तिजोरीत जमा झाला.

By admin | Updated: November 18, 2014 00:08 IST2014-11-18T00:08:15+5:302014-11-18T00:08:15+5:30

चित्रपटगृह, केबल, आॅर्केस्ट्रा, डीटीएच व इतर मनोरंजनाच्या माध्यमातून एप्रिल ते सप्टेंबर २०१४ या सहा महिन्यांच्या कालावधीत राज्यातून तब्बल ४५ कोटींचा करमणूक कर शासनाच्या तिजोरीत जमा झाला.

Recovery of 45 crore tax in six months | राज्यात करमणूक करापोटी ६ महिन्यांत ४५ कोटींची वसुली

राज्यात करमणूक करापोटी ६ महिन्यांत ४५ कोटींची वसुली

संतोष वानखडे, वाशिम
चित्रपटगृह, केबल, आॅर्केस्ट्रा, डीटीएच व इतर मनोरंजनाच्या माध्यमातून एप्रिल ते सप्टेंबर २०१४ या सहा महिन्यांच्या कालावधीत राज्यातून तब्बल ४५ कोटींचा करमणूक कर शासनाच्या तिजोरीत जमा झाला. यात मोठा वाटा चित्रपटगृहांकडून मिळालेल्या कराचा आहे.
विविध प्रकारच्या करांमधून शासनाची तिजोरी भरली जाते. करमणूक कराची रक्कमही शासनाची तिजोरी भरण्यास पूरक ठरत आहे. राज्यभरातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर विभागाकडून या कराची वसुली केली जाते.
गत आर्थिक वर्षात करमणूक कर विभागाने ८९ कोटींच्या करवसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते. प्रत्यक्षात या विभागाने ९२ कोटी ५८ लाख ८६ हजारांची वसुली केली होती. उद्दिष्टापेक्षा जास्त वसुली झाल्याने २०१४-१५ या आर्थिक वर्षात १0५ कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. करमणूक कर विभागाने गत सहा महिन्यात ४५ कोटींचा कर गोळा करून, ४३.३७ टक्के इतकी वसुली केली आहे. एकूण ४५ कोटी ५३ लाख ८४ हजार रुपये करमणूक कर वसूल केला आहे. उर्वरित ६ महिन्यांत ६७ टक्के वसुलीचे आव्हान या विभागासमोर उभे ठाकले आहे.

Web Title: Recovery of 45 crore tax in six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.